महाराष्ट्रात काही निवडणुका नेहमी चर्चेत राहतात त्यापैकी एक महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे आणि स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांची हि निवडणूक चर्चेत राहली आहे. इथे बीजेपीच्या उमेदवाराचा पराभव करत देवेंद्र भुयार हे निवडून आले आहे.
मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर काही दिवसा अगोदर शेदूरजना घाट येथे अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची चारचाकी वाहन पेटविली होती. या घटनेमुळे त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते.
गव्हाणकुंड ता. वरुड जिल्हा. अमरावती येथे सामान्य कुटुंबात जन्म झालेले देवेंद्र भुयार यांचे आई वडील हे शेतकरी आहे आणि एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात असलेली स्वाभिमानी देवेंद भुयार यांच्या रुपात आता विदर्भात हि आपले चांगले पाय रोवत आहे.
तालुक्यातील शेतकरी, जनसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला जेरीस आणणाऱ्या युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना २०१६ मध्ये दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्या राजकारणाची सुरवात आ. बच्चू भाऊ कडू यांच्या सोबत झाली होती या विधान सभेला देखील बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.
अनेक आंदोलनासाठी ते चर्चेत राहतात त्यांनी खानापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला घरकुल बांधून देऊन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. प्रहार चे पंचायत समिती सदस्य असताना एका कब्बडी सामन्याच्या वेळेस स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आणि देवेंद्र भुयार यांची भेट झाली.
त्यांच्या मधील नेतृत्व गुण बघून रविकांत तुपकर यांनी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आणले आणि इथून त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला. जिल्हा परिषद सदस्य ते जायंट किलर ठरून ते आमदार झाले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.