जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात अतितटीचा संघर्ष सुरू असून, तीन मतदार संघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राहुल पाटील हे विजयी झाले आहेत तर जिंतूरमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यामध्ये अटीतटीची लढत चालू आहे.
चारही मतदार संघात चुरशीच्या लढती झाल्या होत्या. परभणी मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार आमदार राहुल पाटील आणि कॉंग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली होती. कॉंग्रेसचे सुरेश नागरे यांनी बंडखोरी केल्यामुळे लढत तिरंगी झाली. तसेच एमआयएम आणि वंचितच्या उमेदवारामुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन झाले.
गंगाखेड मध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे, शिवसेनेचे विशाल कदम, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मधुसूदन केंद्रे यांच्यात लढत होती. महायुतीमधील दोन उमेदवार लढत असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.
गुट्टेनी थेट तुरुंगातून जिंकली निवडणूक-
गंगाखेड मतदार संघात शिवसेनेला जागा सुटली असतानाही रासपने बंडखोरी करत उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली होती.साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी गुट्टे हे तुरुंगात आहेत.त्यांनी तुरुंगात राहून प्रचारात आघाडी घेतली होती.पहिल्या फेरीपासून गुट्टे आणि शिवसेनेचे विशाल कदम यांच्यात अतितटीचा सामना झाला.
पण रत्नाकर गुट्टे यांनी यामध्ये बाजी मारली. विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे उमेदवार मधुसुदन केंद्रे यांचा अत्यंत दारुण असा पराभव झाला असून त्यांना चौथेही स्थान मिळाले नाही. गुट्टे यांच्या विजयाने रासपचे खाते उघडले आहे.
रासपणे जागावाटपात अन्याय झाला म्हणून निवडणुकीपूर्वी नाराजी जाहीर केली होती. तसेच त्यांच्या वाटेला आलेल्या 2 जागा भाजपच्याच आहेत असे जाहीर केले होते. त्यामुळं हि एकमेव जागा लढवत रासपने येथे विजय मिळवला आहे.
परभणी सेनेकडे, पाथरीत कॉंग्रेस-
परभणीत शिवसेनेचे राहुल पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवल्याचे जवळपास निश्चीत झाले आहे.पाटील यांना 67 हजार 490,एमआयएमचे अली खान यांना 16 हजार 538 मते मिळाली आहेत.त्यामुळे तब्बल 50 हजार 952 मतांनी आघाडीवर आहेत.
तर पाथरी मतदार संघात कॉंग्रसचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांनी अतितटीच्या लढतीत जवळपास त्यांचा विजय निश्चीत झाला असून केवळ औपचारीक घोषणा बाकी आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.