औरंगाबाद मधील कन्नड मतदार संघ गाजला दोन जावयांच्या लढतीमध्ये गाजली आहे. परंतु या जावायांच्या लढाईत तिसऱ्याने बाजी मारलेली दिसत आहे. शिवसेनेचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांची थेट लढत होती.
हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जवाई आहे. आणि यांच्या सोबत शिवसेनेचा मतदारसंघ असलेल्या कन्नड विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे होते.
रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव व लोणीकरांचे जावई पवार यांच्यात चुरस पाहावयास मिळेल अशी अपेक्षा होती परंतु या दोघाच्या लढतीमध्ये शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांनी इथे बाजी मारलेली दिसत आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांवर खालच्या पातळीवर जाऊन जाधव यांनी प्रचारा दरम्यान टिका केली होती, त्याचा मोठा फटका त्यांना बसतांना दिसतो आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोनवेळा निवडणूक जिंकली होती.
दिवंगत नेते रायभान जाधव यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांनी पहिल्यांदा मनसे, तर दुसऱ्यावेळी शिवसेनेकडून विधानसभेत प्रवेश केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देत मागील लोकसभा निवडणूक लढविली. त्यांनी केलेल्या मतविभाजनामुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे पराभूत झाल्याचे मानले जाते.
राज्याचे मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांनाही मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. कन्नडमध्ये भाजप नेत्यांच्या दोन जावयांची लढत पाहावयास मिळणार असी अपेक्षा होती.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.