वेगवेगळ्या एक्जीट पोल नंतर आज खरा निकाल समोर आलेला आहे. तर यामध्ये महाराष्ट्रात वेगळे चित्र आणि बदलाचे वारे वाहताना दिसत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठा कलगीतुरा पाहायला मिळाला.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार हे पराभवाच्या छायेत दिसत आहे इथे कॉंग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर हे आघाडीवर दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि जलसंधारणमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात कर्जत आणि जामखेड या मतदार संघात अटीतटीची लढत आहे. महाराष्ट्रात चर्चेत असलेली बिग फाईट राम शिंदे विरुद्ध रोहित पवार कर्ज जामखेड येथे रोहित पवार बाजी मारताना दिसत आहे.
यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेली लढत आहे पंकज मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री तर धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे विरोध पक्ष नेता आहे. बहीण भावाच्या या लढाईत धनंजय मुंडे हे बाजी मारताना दिसत आहे. परळी मतदार संघात हि लढाई सुरु आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जलसंपदा-जलसंधारण तथा संसदिय कार्य महाराष्ट्र राज्य मंत्री हे विजय शिवतारे पुरंदर मतदार संघातून लढाई लढत आहे. यांच्या विरोधात कॉंग्रेसचे संजय जगताप हे निवडणूक लढत असून त्यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.