दिवसेंदिवस वाहन कायद्यात नवनवीन नियम समाविष्ट होत आहेत. कधी मोटार वाहन कायद्यात बदल होतंतयत, कधी रस्त्यांवर वाहन चालवण्याच्या नियमांमध्ये बदल होत आहेत. हेल्मेटसक्ती असो किंवा चारचाकी गाड्यांना पारदर्शक काचा लावण्याचा नियम असो, चालकांना वेगवेगळ्या नियमांना सामोरे जावे लागत आहे.
आता वाहनांच्या नंबर प्लेटसाठीही एक नवा नियम समाविष्ट होणार असून नियम न पाळल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पाहूया काय आहे हा नवा नियम…
वाहनांच्या नंबर प्लेट नियम काय आहेत ?
वाहनांच्या नंबर प्लेट कशा असाव्यात यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. सेंट्रल मोटार व्हेइकल कायद्याच्या कलम ५१ अन्वये वाहनांच्या नंबर प्लेटवरील अक्षरे व त्यांचा आकार ठरवून देण्यात आले आहेत. या कायद्यानुसार वाहनांवर नंबर प्लेट लावणे कायद्याने बंधनकारक आहे.
चाकी वाहनांची पुढील नंबर प्लेटची लांबी २६ सेंमी, रुंदी ४ सेंमी आणि अक्षरांची उंची ३० मिलिमीटर असावी. अंकांची जाडी ५ मिलिमीटर असावी. पांढऱ्या पाटीवर काळी अक्षरे असावीत. नंबर प्लेटवर या क्रमांकाशिवाय इतर काहीही (नाव, नक्षी, चित्र, फोटो, आदी.) चालत नाही. हे क्रमांक स्पष्ट व सरळच असावे लागतात, ते फॅन्सी नसावेत.
काय आहे नवा नियम ?
वाहनांच्या नंबर प्लेटच्या नवीन नियमांनुसार वाहनांच्या पुढच्या बाजूस पांढऱ्या रंगाची आणि मागच्या बाजूस लाल रंगाची रेट्रो रिफ्लेक्टीव टेप लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. टेपची लांबी जास्तीत जास्त २० मिलीमीटर असावी. जर ही टेप लावली नाही तर वाहनचालकाकडून दंड वसूल केला जाणार आहे.
रात्रीच्या अंधारातही हा टेप चमकल्याने आपल्या मागेपुढे वाहन असल्याचा अंदाज वाहनचालकाला येणार आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.