सोशल मीडियावर सध्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले बघायला मिळत आहेत. पिवळ्या साडीत असलेल्या या अधिकारी महिलेला रातोरात प्रसिद्धी मिळाली होती.
त्या सोबतच निळ्या ड्रेस वाल्या मैडम तर त्या भोपाल येथील आयआयटी गोविंदपुरा येथील बुथवर कार्यरत होत्या. त्यांचे नाव योगेश्वरी असून त्यांचा हा फोटो पत्रिका या वृत्तपत्राचे फोटोग्राफर अजय शर्मा यांनी काढला आहे.
सुरवातीला नलिनी सिंह नावाने प्रसिद्धी मिळालेल्या या अधिकाऱ्याचे सत्य नंतर कळले कि , त्यांचे नाव नलिनी सिंह नसून रीना द्विवेदी आहे. नवभारत टाइम्सने यासंबंधी वृत्त दिले असून त्यामध्ये हे फोटो जयपूरचे नाही तर लखनौचे असल्याचे सांगण्यात आले आहे. हे फोटो पत्रकार तुषार रॉय यांनी काढलेले आहेत. ईव्हीएम मशीन घेऊन रिना द्विवेदी या लखनौच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे.
व्हायरल झालेले फोटो ५ मे २०१९ म्हणजे निवडणुकीच्या एक दिवसाआधीचे आहेत. त्या दिवशी रीना द्विवेदी लखनौच्या नगराममध्ये बूथ नंबर १७३ वर होत्या. परंतु यावेळेस उत्तर प्रदेशातील अकरा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.
रिना तैनात असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं. विशेष म्हणजे इतर पोलिंग बूथवर शुकशुकाट असताना द्विवेदींच्या मतदान केंद्रावर मात्र तोबा गर्दी झाल्याचं म्हटलं जातं. रिना द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार एक हजार मतदान असलेल्या बूथवर दुपारपर्यंत 300 जणांनी मतदान केलं होतं.
त्यांचे आता टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवरून त्या टिकटॉक या अँपवर देखील ऍक्टिव्ह असल्याचं दिसतं. रविवारी सकाळी जेव्हा रिना पोलिंग बूथवर ईव्हीएम किट घेण्यासाठी पोहचल्या होत्या, त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.