निवडणुकांनंतर Exit Poll चे आकडे आले आहेत. कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील याचे निकाल लागण्याच्या आधीच वर्तवलेले अंदाज म्हणजे Exit Poll ! सर्व पोल्समध्ये भाजप महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेत विराजमान होईल असे या पोलचे म्हणणे आहे.
परंतु Exit Poll च्या पुढे जाऊन पुण्यातील गिरिश बापटांनी चक्क फळ्यावर किती मतांनी विजय मिळेल त्याचा आकडेच लिहल्याने पुण्यात त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
आधी आमदार, मग खासदार आणि आता पोल
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून गिरीश बापट विजयी झाले होते. त्यानंतर फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांना अण्णा, नागरी पुरवठा, पुनर्वसन मंत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांना काम करता आले.
पुण्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात तूरडाळ घोटाळा प्रकरण चांगलेच गाजले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.
बापटांच्या जागी टिळक
गिरीश बापट खासदार झाल्यानंतर रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उतरवले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेच्या विशाल धनवडेंनी बंडखोरी केली असून मनसेने अजय शिंदेंना मैदानात उतरवले होते. यंदा गिरीश बापट उमेदवार नसल्याने मोठ्या प्रमाणावर मते फुटण्याची शक्यता होती. परंतु बापटांनी आपली पूर्ण ताकत मुक्ता टिळक यांच्या पाठीशी उभा केली होती.
भाजपचा गिरीश बापट पोल
भाजपचे गिरीश बापट कसबा मतदारसंघातील प्रत्येक निवडणूकीनंतर मताधिक्याचा आकडा आपल्या डायरीत लिहून ठेवतात असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीवेळीही त्यांनी लिहलेला मतांचा आकडा खरा ठरला होता. यंदाही विधानसभा मतदानानंतर त्यांनी आकडेमोड करुन मुक्ता टिळक किती मतांनी विजयी होणार याचा आकडा काढला आहे.
मतदानानंतर रात्रीच १०:३० वाजता चक्क फळ्यावर मुक्ता टिळक ५०००० मतांनी विजयी होतील हा आकडा त्यांनी आपली सही करुन लिहून ठेवला आहे. आता सर्वांनाच निकालात काय होतंय याची उत्सुकता लागली आहे.
आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..