सातारा कोरेगाव मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या केंद्रावरील ईव्हीएमवरील कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळ या चिन्हालाच जात असल्याचं समोर आलं. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सांगितले. केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही ही बाब मान्य केली आणि तातडीनं ईव्हीएम बदलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातल्या खटाव तालुक्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटन दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत दिल्याचे दिसत होते. ग्रामस्थांच्या हा प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.
विशेष म्हणजे हा प्रकार समोर आला तेव्हा सकाळचे 11 वाजून गेले होते. म्हणजेच मतदानाला सुरुवात होऊन चार तास झाले होते. तोपर्यंत 291 मतदारांनी मत नोंदवलं होतं. केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही हा प्रकार होत मान्य करत ईव्हीएम बदललं. मात्र ईव्हीएम बदललं तरी त्याआधी आम्ही केलेल्या मतदानाचं काय असा प्रश्न नाराज मतदारांनी विचारला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी असं मागणी मतदारांनी केली आहे.
या नंतर अनेकांना हा प्रश्न पडत आहे कि एव्हीएम खराब झाल्यावर मत भाजपलाच का जातात ? बहुतांश घटनात मत हे भाजपला जाताना लोकांना दिसत आहे. आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..