संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.येत्या २४ तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. ३ हजार २३७ उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यात संध्याकाळी पाचपर्यंत ५५ % टक्के मतदान आला. महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार – 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750 महिला मतदार- 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत. दिव्यांग मतदार – 3 लाख 96 हजार आहेत सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ६३.३८ टक्के मतदान झालं होतं. मात्र, यंदा हा आकडा ४ टक्क्यांनी कमी होऊन ५८ ते ५९ टक्क्यांपर्यंतच अडकला आहे. तर या निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर मध्ये झाले असून पाच वाजेपर्यंत करवीर मध्ये तब्बल ७९% पर्यंत मतदानाचा आकडा गेला आहे.
तर या उलट उल्हासनगर मध्ये फक्त २६.२७% एवढीच मतदानाची नोंद झालेली आहे. अतिशय कमी हा आकडा आहे. पालघर विधानसभा मतदार संघातील किनारपट्टी वरील टिघरेपाडा,वाढवण,वरोर,धाकटीडहाणू,बहाड, बाडापोखरण या गावांनी वाढवण बंदराविरोधात मतदानावर बहिष्कार टाकल्याने दुपारी १ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती.
कोणत्याही गावामध्ये राजकीय पक्षाने एकही मतदान पोलिंग बूथ देखील लावलेले नाहीत किंवा पोलिंग एजंटही बसवले नाहीत. याउलट या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवण बंदर विरोधी भूमिका घेत या गावकऱ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन उस्फूर्तपणे मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.