2014 च्या लोकसभा निवडणुकीची गोष्ट आहे, स्व. गोपीनाथराव मुंडे विरुद्ध सुरेश धस प्रचार शिगेला पोचला होता, सुरेश धसांच्या गावरान शैलीत फटके आणि जनतेचा आवेश असं होत होत राजकरण पातळी सोडत होत; एका ठिकाणी सुरेश धसांची जीभ घसरली आणि धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत “पंकजा मुंडेंचा पायात घुंगरू बांधून नाचायला नाही लावले तर नावाचा सुरेश धस नाही म्हणाले.”
त्यांना वाटलं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्यांचा राजकीय विरोध टोकाचा आहे आपल्याला धनूभाऊकडून दाद मिळेल, झालं नेमकं उलटं, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवत धनंजय मुंडेंना आपल्या बहिणीविषयी केलेले वक्तव्य जिव्हारी लागले आणि कसलाही विचार न करता “त्यांनी सुरेश धसच्या कानाखाली जो आवाज काढला” तो आजपर्यंत धस विसरले नसतील.
त्याच सुरेश धसने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्व.मुंडे साहेबांवर कुठल्या पातळीवर जाऊन टीका केली हे वेगळे सांगायला नको, संबंध बीड जिल्हा ते जाणतो, आणि त्यालाच पक्षात आणण्यासाठी कुणी जोर लावला ?? तेव्हा पंकजाताईंना स्वतःचा अपमान नाही आठवला का ??? स्व. मुंडे मुंडे साहेबांवर केलेली जहरी टीका नाही आठवली का ?? पण तुमच्या स्वाभिमानासाठी धसचा समाचार घेतलेला भाऊ मात्र राक्षस वाटतो.??
ज्या रमेश आडसकरने 2009ला स्व. मुंडे साहेब विरोधात “वाजवा तुतारी… हटवा वंजारी” ची घोषणा देऊन बीड जिल्ह्यात जातीय राजकारण आणून वातावरण नासवले,आज त्यालाच पक्षात घेऊन पंकजाताई तुम्ही भाऊ म्हणवून घेता??
पण तिकीट जाहीर झालेला असताना 2009 ला आपल्याला जागा सोडणारा धनंजय मुंडे तुम्हाला वैरी वाटतो?? शेवटी एवढेच सांगेन मान-अपमान हा ह्यांच्यासाठी केवळ राजकीय सोयीसाठी असून, भावनेचा बाजार कसा भरवता येईल ह्याचेच राजकारण त्या करत आल्या आहेत आणि करणार आहेत; पंकजाताई आपण जरी स्वतः ला संघर्षकन्या म्हणवून घेत असाल पण जनता धनंजय मुंडेंचा “संघर्ष” विसरणार नाही.
रडून-पडून, भावनेचे राजकारण करून एखादेवेळी निवडून पण याल, पण रक्ताच्या भावा-बहिणीच्या पवित्र नात्यात कालविलेले “हे विष” कसं उतरविणार ?
-अक्षय पाटील