विधानसभेच्या प्रचारानिमित्त शेवटच्या २-३ दिवसात वातावरण चांगलंच तापलं होतं. राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शरद पवारांची पावसातील सभा, धनंजय आणि पंकजा मुंडे या बहीण-भावाचा वाद यावरून वातावरण ढवळून निघालं. पण या सर्वामध्ये एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा एक डान्सचा व्हिडीओ चांगलाच हिट झाला.
औरंगाबादमधील पैठण गेट परिसरात प्रचारसभा घेतल्यानंतर त्यांनी जबरदस्त डान्स केला. ओवेसी चांगलेच मुडमध्ये असून गाण्याच्या ठेक्यावर डान्स करताना दिसत आहेत. सभा झाल्यानंतर स्टेजवरून खाली उतरताना त्यांनी हा जोरदार डान्स केला.
ओवेसी हे सभा आटपून स्टेजवरून खाली उतरत होते. त्याचवेळी तिथे “मिया मिया, मिया भाई” हे गाणं लागलं. हे गाणं ऐकून ओवेसींना स्वतःला आवरता आलं नाही आणि त्यांनी तिथेच जोरदार डान्स केला. यावेळी ओवेसी यांच्या हातात फुलांचा हारही दिसत आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढलेला एमआयएम यावेळेस स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. औरंगाबादमधून एमआयएमचे इम्तियाज जलील हे अटीतटीच्या लढतीत विजयी झाले होते. विधानसभेला देखील एमआयएमने अनेक ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत.
बघा डान्सचा व्हिडीओ-
Maharashtra: AIMIM Chief Asaduddin Owaisi performs a dance step after the end of his rally at Paithan Gate in Aurangabad. (17.10.2019) pic.twitter.com/AldOABp2yd
— ANI (@ANI) October 18, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.