क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे उडवल्याचे आजपर्यंत आपण अनेक उदाहरण ऐकले असतील. लाखो रुपये क्लबमध्ये उडवणारे अनेक शौकीन असतात. पण हाच आकडा जर करोडमध्ये असेल तर थोडा धक्काच बसतो ना. होय १-२ नव्हे तर तब्बल ८ कोटी रुपये एका रात्रीत उडवले आहेत. अन हा उडवणारा व्यक्ती कोणी साधासुधा व्यक्ती नसून तो आहे मुख्यमंत्र्यांचा भाचा.
मध्ये प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या आरोपपत्रात रतुल पुरीने अमेरिकेतील नाइटक्लबमध्ये एका रात्रीत ११ लाख डॉलर म्हणजेच ७.८ कोटी रुपये उडविले आहेत. याशिवाय, रतुल पुरीचे सहकारी आणि मोजरबेअर इंडिया कंपनीचे नाव सुद्धा या आरोपपत्रात आहे.
अंमलबजावणी संचालनालयाकडून गुरुवारी दिल्ली न्यायालयात ११० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून मोजरबेअर इंडिया कंपनीने आपल्या सब्सिडियरी आणि असोसिएट कंपन्यांमध्ये ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
रतुल पुरी यांनी तब्बल ८००० कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप असून मोजरबेअर इंडिया कंपनीने बँकांकडून मिळणारे कर्ज आपल्या सब्सिडीयरीज कंपन्यांमध्ये ट्रान्सफर केले. मनी लॉन्ड्रिंगसाठी बनावट कंपन्या तयार केल्या. असे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हंटले आहे.
एका रात्रीत क्लबमध्ये उडवले ८ कोटी-
रतुल पुरी यांच्या सर्व व्यवहारांची चौकशी ईडीने केली. त्यात त्यांनी भारत आणि विदेशातील अनेक महागड्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी ट्रान्जक्शन केलेले उघड झाले. एवढेच नाही तर त्यांनी प्रोव्होकेटर या एका क्लबमध्ये एका रात्रीत तब्बल ११ लाख ४३ हजार ९८० डॉलर (जवळपास ७.८ कोटी रुपये) खर्च केले आहेत.
एवढेच नाही तर पुरी यांनी आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी नोव्हेंबर २०११ आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान तब्बल ३०-३५ कोटी रुपये खर्च केले आहेत. ३६०० कोटी रुपयांच्या अगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात सुद्धा रतुल पुरी आरोपी आहे. त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी २० ऑगस्टला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो अटकेत आहे. या प्रकरणात त्यांची २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.