राजस्थानमधील बिकानेर शहरातील गंगा बिशन अग्रवाल यांनी १९३७ मध्ये एक छोटेसे दुकान सुरु केले होते. त्यांची आई त्यांना लाडाने हल्दीराम म्हणायची. बिकानेरची ओळख असणाऱ्या भुजियाला त्यांनी वेगळ्या पद्धतीची रेसिपी वापरुन नवीन चव दिली.
गंगाबिशन यांनी ह्या भुजिया आपल्या दुकानात विक्रीला ठेवल्या. ग्राहकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पुढे बिकानेरच्या महाराजा डुंगर सिंग यांच्या नावाने त्यांनी आपल्या भुजियाला “डुंगर सेव” हे नाव दिले. दहा वर्षातच त्यांची विक्री २०० किलोपर्यंत जाऊन पोहोचली.
गंगाबिशन कलकत्याला एका लग्नासाठी गेल्यांनतर त्यांना तिथे आपले एक दुकान उघडण्याची कल्पना सुचली. तिथून त्यांच्या व्यवसायाला खरी सुरुवात झाली. त्यांच्या नातू मनोहरलाल आणि शिवकुमार यांनी हा व्यवसाय नागपूर आणि दिल्लीपर्यंत नेला.
आज हल्दीराम हा पार्लेनंतरचा देशातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. आजघडीला हल्दीरामची वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स उत्पादने आहेत. आजघडीला कंपनीची वार्षिक उलाढाल ५००० कोटींच्या घरात आहे. कमाईच्या बाबतीत हल्दीराम HUL, नेस्ले, डॉमिनोज, मॅकडोनाल्ड अशा कंपन्यांनाही टक्कर देते.
हल्दीराम खरेदी करणार ही १३० कोटींची कंपनी
राष्ट्राची कंपनी विधी न्यायालयात क्वालिटी डेअरीचा खटला सुरु आहे. ही डेअरी कर्जाच्या बोझ्याखाली दबली असून तिच्यावर १९०० कोटींचे कर्ज आहे. क्वालिटी डेअरीने २०१६ मध्ये केकेआर इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेसकडून ३०० कोटी रुपये घेतले होते.
त्यानंतर केकेआर इंडिया कंपनीने क्वालिटी डेअरी विरोधात दिवाळखोरीचे अपील दाखल केले होते. डिसेंबर २०१८ मध्ये कोर्टाने या डेअरीचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. लिलावात हल्दीरामने १३० कोटी रुपयांची बोली लावून ही कंपनी खरेदी केली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.