केबीसी सुरू होताच अमिताभ बच्चन अगदी जोशामध्ये आपल्या स्पर्धकांना मंचावर आमंत्रित करतात. बॉलिवूड शहेनशहाच्या दमदार आवाजाने हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून चांगला गाजवला आहे. कार्यक्रम सुरु असताना अमिताभ कधीकधी आपल्या आयुष्याशी संबंधित आठवणी सांगून स्पर्धकाला गंभीर वातावरणातही शांत ठेवतात.
त्यांचे किस्से ऐकून आजूबाजूचे वातावरणही थोडे आनंदी होते. बिग बी आपल्याला त्याच्या आयुष्याशी आणि चित्रपट जगाशी संबंधित किस्से सांगू शकतो, पण केबीसीबद्दल काही अपरिचित गोष्टी अद्याप कुणाला माहित नाहीत.
१) हॉट सीटवर पोहोचण्यापूर्वी बिगबी बॅकस्टेजला स्पर्धकाविषयी संपूर्ण माहिती घरात. जेणेकरून त्यांच्याबरोबर त्यांचा चांगला ताळमेळ बसेल. २) केवळ स्पर्धकच नव्हे तर अमिताभ बच्चन यांनाही प्रश्नाचे उत्तर तोपर्यंत माहित नसते, जोपर्यंत स्पर्धकाचे उत्तर लॉक केले जात नाही.
३) स्पर्धक तोपर्यंत शो सोडून जाऊ शकत नाही, जोपर्यंत संपूर्ण शूटिंग संपत नाही. ४) जर बिगबींनी एखाद्या स्पर्धकाला आपला ऑटोग्राफ दिला तर तेथील क्रू मेंबर्सने त्यांचे ऑटोग्राफ केलेले पुस्तक काढून घेतात आणि परत करत नाहीत.
५) अमिताभ बच्चन यांच्या कोटाची किंमत प्रति भागासाठी दहा लाख इतकी रुपये आहे. ६) स्पर्धकांना ३०% इन्कम टॅक्स कपात करुन जिंकलेल्या बक्षिसाची रक्कम दिली जाते. जर स्पर्धकाने १ कोटी जिंकले असतील, तर त्याला केवळ ७० लाख बक्षीस दिले जाते.
७) १८ वर्षाखालील मुलांना कॅमेर्याजवळ ठेवले जाते, जेणेकरुन ते स्क्रीनवर दिसणार नाहीत. त्यांना स्क्रीनवर तेव्हाच दाखवले जाते, जर ते स्पर्धकाचं कुटुंबातील असतील.
८) फास्टेस्ट फर्स्ट फिंगरच्या निकालानंतर ब्रेक घेतला जातो, कारण स्पर्धकाला होत सीटवर घेऊन जाण्याआधी त्याचा मेकअप करता येईल. ९) संगणकाद्वारे विचारले जाणारे सर्व प्रश्न रिअल टाइम असतात. याचा अर्थ असा आहे की बिग बी पासून थोड्या अंतरावर एक टेक्निशियन व्यक्ती बसते, जो स्पर्धकाच्या कामगिरीनुसार प्रश्न सोपे आणि अवघड विचारत राहतो.
१०) हॉट सीटवर पोहोचण्यासाठी स्पर्धकाला एसएमएस फेरी, पर्सनल कॉल जीके राऊंड्स आणि ऑडिशन यातून जावे लागते. त्यानंतर त्याला शोमध्ये फास्टेस्ट फर्स्ट फिंगर खेळण्याची संधी मिळते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.