देशातील १३ राज्यांत १६ महिलांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली असताना, पुरोगामित्वाचा वसा व प्रागतिकतेचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात मात्र गेल्या ५७ वर्षांत एकही महिला मुख्यमंत्री लाभली नाही. समतेचे मूल्य आणि स्त्रीशिक्षणाची पायाभरणी हि महाराष्ट्रातच झाली. पण दुर्दैव म्हणजे आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात बनली नाही.
महाराष्ट्राची कन्या म्हणून गौरवण्यात आलेल्या प्रतिभाताई पाटील यांना देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला. त्यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान महिला महाराष्ट्राच्या राजकारणात होत्या पण मुख्यमंत्री पदापर्यंत कोणालाच जाता आले नाही.
राज्यात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसने देशाला पहिली महिला पंतप्रधान, पहिली महिला राष्ट्रपती, पहिली महिला पक्षाध्यक्षा दिली; पण महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीने देशाला महिला धोरण दिले पण राष्ट्रवादीकडे अद्याप मुख्यमंत्रीपदच आले नाही. राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळेंकडे मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार म्हणून बघितले जाते.
हि चर्चा आता करण्याचे कारण म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी एका मुलाखतीत सध्याच्या निवडणुकीवर केलेलं भाष्य आहे. राष्ट्रवादीच्या राजकीय वारसदारापासून ते अजित पवारांनी बाळासाहेबांविषयी केलेल्या खुलाश्यापर्यंत त्यांनी या मुलाखतीत उत्तरं दिली. यावेळी सुळे यांनी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री पदासाठी नावही सुचवलं.
सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हि उत्तरं दिली. शरद पवारांचे राजकीय वारसदार हा येणारा काळ ठरवेल असे त्या म्हणाल्या. “कुठलाही राजकीय पक्ष एका कुटुंबाची मक्तेदारी नाही. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार शरद पवार ठरले. वारसदार होणे हे काही शेअर्स नाहीत. तो वारसा कुणालाही मिळू शकतो,” असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून या आमदाराकडे बघतात सुप्रिया सुळे-
या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी आपल्या मनातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण हे सांगितले आहे.
सुप्रिया सुळेंच्या मनातील या मुख्यमंत्री आहेत आमदार प्रणिती शिंदे. ”प्रणिती शिंदे. प्रणिती शिंदे वकिल आहे. खूप कष्ट घेते. तसेच स्थानिक पातळीवर तिचं खूप चांगलं काम आहे,” असं त्या म्हणाल्या.
प्रणिती शिंदे या देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार आहेत. हा मतदार संघ शिंदेचा गड मानला जातो. त्या या मतदारसंघात २००९ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या. २०१४ मध्ये त्यांनी मोदी लाटेतही विजयी झाल्या. यावेळी त्या हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.