बिग बी अमिताभ बच्चन सध्या मुंबईतल्या नानावटी हॉस्पिटल दाखल आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अमिताभ बच्चन हे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत. यकृताच्या आजारामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉ. बर्वे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, त्यांचे फक्त २५ टक्के यकृत काम करते आहे ७५ टक्के खराब झाले आहे.
अमिताभ यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी २ वाजता रुग्णालयात भरती करण्यात आलं. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. १९८२मध्ये कुलीच्या सेटवर झालेल्या अपघातामुळे त्यांचा यकृताचा आजार बळावला.
या अपघातानंतर त्यांचं ७५ टक्के लिव्हर खराब झालं होतं. सिरोसिसमुळे त्यांच्या लिव्हरने काम करणं थांबवल्याचं सांगण्यात येतं. अमिताभ यांना मार लागल्यानंतर चुकीने एका रक्तदात्याचं रक्त त्यांच्या शरीरात गेलं होतं. त्यामुळे त्यांना काविळ झाली होती, असं सूत्रांनी सांगितलं.
अमिताभ यांना एका विशेष कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आल्याने त्यांना भेटायला अद्याप एकही सेलिब्रिटी आलेला नसल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, मेमध्येही अमिताभ यांची तब्येत बिघडली होती. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
काय आहे नेमका अमिताभ यांना आजार?
१९८२ मध्ये कुलीच्या शूटिंग दरम्यान त्यांना दुखापत झाली होती. वेल्लोरच्या प्रसिद्ध सर्जन एच.एस. भट्ट यांनी अमिताभ यांचे सगळे रिपोर्ट पाहिले आणि त्यांच्या शरीरात इन्फेक्शन पूर्णपणे पसरले असून त्यांच्यावर तात्काळ ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे सांगितले.
ऑपरेशन करताना डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्यांच्या पोटातील महत्त्वाच्या आतडीला प्रचंड दुखापत झाली होती. त्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले. पण त्यानंतर त्यांना लगेचच निमोनिया झाला. त्यामुळे त्यांचे रक्त पातळ होत होते.
अमिताभ यांना दुखापत झाली, तेव्हा चुकीने त्यांच्या शरीरात एका अशा डोनरचं रक्त पुरवण्यात आलं ज्याला हिपेटायटिस-बी वायरस होता. यामुळे अमिताभ यांचा यकृताचा आजार आणखी वाढला.
दरम्यान अमिताभ यांच्यावर मागील ३ दिवसांपासून उपचार सुरु असून रुग्णालयात अमिताभ यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही आहे. चाहत्यांसाठी मात्र हि चिंता वाढवणारी बाब आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.