जसे की आपल्याला माहित आहे, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा रस्त्यांचे जाळे असणारा देश आहे. सर्व प्रमुख आणि छोट्या शहरांना, खेड्यांमध्ये हे रस्त्याचे जाळे पसरले आहे.
आपल्याला माहिती असेल की भारतात रस्त्यांमध्ये एक्सप्रेस वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि इतर प्रमुख जिल्हा आणि ग्रामीण रस्ते यांचा समावेश होतो. पण राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवे यामध्ये काय फरक आहे ? चला तर या लेखाद्वारे जाणून घेऊया…
राष्ट्रीय महामार्ग काय असतो ?
राष्ट्रीय महामार्ग हा रस्त्यांच्या पायाभूत रचनेचा कणा आहे, जो भारताच्या सर्व प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडतो. राष्ट्रीय महामार्गांमध्ये दोन, चार किंवा अधिक लेन असतात. हे रस्ते डांबर किंवा सिमेंट काँक्रेटपासून तयार करण्यात आलेले असतात. अनेक शहरांमधील व्यापार राष्ट्रीय महामार्गांद्वारे होतो. या रस्त्यावर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची मालकी असते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ (NHIDCL) आणि राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्याद्वारे या रस्त्यांचे बांधकाम आणि व्यवस्थापन केले आहे. भारतात एकूण २२८ राष्ट्रीय महामार्ग असून त्यांची लांबी १३१३२६ किमी आहे.
एक्सप्रेसवे काय असतो ?
भारतात एक्सप्रेसवे मध्ये उच्च श्रेणीचे रस्ते येतात. हे सहा ते आठ लेन असणारे महामार्ग असतात. एक्सप्रेस वे मार्गांचे प्रवेश आणि निर्गम हे लहान रस्ते वापरुन नियंत्रित केले जातात. परंतु एक्सप्रेसवेला इतर कोणतेही रस्ते जोडले जात नाहीत. एक्सप्रेसवे हे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) आणि व्हिडिओ इव्हेंट डिटेक्शन सिस्टम (VIDS) यासारख्या सुविधा असतात.
एक्स्प्रेसवेलाच द्रुतमार्ग किंवा द्रुतगतीमार्ग देखील म्हणतात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत त्यांची बांधकाम, देखभाल आणि नियंत्रण केले जाते. भारतात साधारणपणे २१ ते २५ एक्सप्रेसवे असून त्यांची लांबी जवळपास १५८१४ किमी आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.