विधानसभा निवडणूक अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या ५ दिवस अगोदर भाजपने एक अंतर्गत सर्वे केला आहे. ज्यामध्ये काही धक्कादायक निकाल लागू शकतात असे सांगण्यात आले आहे.
भाजपला राज्यात मोठा विजय होईल असा विश्वास आहे. अंतर्गत सर्व्हेमध्ये देखील मोठा विजय मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजप या निवडणुकीत मित्रपक्षाचे मिळून १६४ जागांवर निवडणूक लढवत आहे. या १६४ जागांचा हा सर्वे करण्यात आला. या सर्वेनुसार भाजपचा १६४ पैकी १२२ जागांवर विजय होईल तर २ जागांवर पराभव होईल असे सांगण्यात आले आहे. तर उर्वरित ४० जागांवर टफ फाईट असल्याचे चित्र आहे.
पराभव होईल असे सांगण्यात आलेल्या त्या २ जागा कोणत्या?
भाजपचे नेते या निवडणुकीत २२० चा आकडा पार होणार हे पूर्वीपासूनच सांगत आहेत. भाजप सेनेचे सरकार बहुमतासह स्थापन होणार असा अंदाज आहे. भाजप या निवडणुकीत १६४ जागा लढवत आहे. भाजपच या निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळवेल अशी चर्चा आहे. भाजप लढवत असलेल्या १६४ पैकी १२२ जागा जिंकेल तर ४० ठिकाणी टफ फाईट होईल असे सांगण्यात आले आहे.
भाजपने बारामती आणि मालेगाव मध्ये पराभव होऊ शकतो असे आपल्या सर्व्हेत सांगितले आहे. भाजपच्या सर्व्हेत या दोनच जागावर पराभव होईल असे सांगितले आहे. बारामतीत अजित पवार यांच्यासमोर गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने इथे विजयाचा पूर्वी दावा केला होता पण सर्व्हेत मात्र इथे पराभव होईल असे सांगितले आहे.
दुसरी पराभव होऊ शकतो अशी जागा आहे मालेगावची. मालेगावमध्ये कांग्रेसचे विद्यमान आमदार आसीफ शेख जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आमदार शेख यांचे पिता रशीद शेख हे येथील महापौर आहेत. जनता दलाचे सर्वेसर्वा निहाल अहमद यांचा हा बालेकिल्ला होता, मात्र १९९९ मध्ये विद्यमान महापौर रशीद शेख यांनी त्यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ उपाधी मिळवली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.