राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील तीन सभा काल रद्द कराव्या लागल्या. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा असल्याने हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली होती. कोल्हेंची जळगावमधील एरंडोल मध्ये सभा पार पडली. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टर उड्डाणास पुणे जिल्ह्यात बंदी असल्याने पोहचता आले नाही.
त्यामुळे त्यांना चोपडा, पाईट, भोसरी, पिंपरी, चिंचवड, येथील सभा रद्द कराव्या लागल्या. ऐनवेळी सभा रद्द कराव्या लागल्याने अमोल कोल्हे यांनी आपली गाडी रस्त्यात थांबवून थेट फोनवरूनच सभेला संबोधित केले.
त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून विरोधकांना प्रचारापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप देखील केला आहे. ते म्हणतात की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे परिसरात असल्याने सभेला येऊ शकलो नाही. हेलिकॉप्टर उड्डाण घेण्यासाठीच्या परवानगी नाकारण्यात आली आहे. पुणे परिसरात पंतप्रधान असल्याने हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. पण खरोखर प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही की, जर देशाचे पंतप्रधान पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी येत असतील तर त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे.’
इतर पक्षांना प्रचार करण्यास नाकारलं जात आहे, हे कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे याविषयी संभ्रम निर्माण होत आहे, असंही ते म्हणाले.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.