निवडणुकीच्या काळात फेसबुक, व्हाट्सअप एकेमकांच्या उमेदवारांच्या समर्थनातील आणि विरोधातील पोस्ट, व्हिडीओ, फोटोंनी गजबजून जाते. सगळीकडे आरोप प्रत्यारोपांचे पडसाद उमटतात. कार्यकर्त्यांच्या पैजा लागतात.
काहीवेळा वादही होतात. पण अशा सगळ्या कल्लोळामध्ये राजकारण, निवडणूक किंवा मतदानाबद्दल खूप चांगले असे लेखही वाचनात येतात. पण दुर्दैवाने कार्यकर्ते असे लेख फॉरवर्ड करण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानतात. व्हाट्सअपवर आलेला असाच एक सुंदर लेख आम्ही या ठिकाणी आपल्यासाठी देत आहोत.
मतदान का करायचे ?
१) मतदान नक्की करा, कारण १७७६ मध्ये अमेरिकेत केवळ एक मत जास्त पडल्याने जर्मनऐवजी इंग्रजी ही अमेरिकेची राष्ट्रभाषा बनली होती.
२) मतदान नक्की करा, कारण २००८ मध्ये राजस्थानमधील नाथद्वारा जागेवर सी.पी.जोशी यांचा केवळ एका मताने पराभव झाला होता. त्यावेळी वेळ संपल्याने त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरलाच मतदान करता आले नव्हते.
३) मतदान नक्की करा, कारण १९२३ मध्ये केवळ एक मत जास्त पडल्याने अडॉल्फ हिटलर नाझी पक्षाचा अध्यक्ष बनला होता आणि तेव्हापासून हिटलरशाहीचे युग सुरु झाले.
४) मतदान नक्की करा, कारण १८७५ मध्ये केवळ एका मताने फ्रांसमधील राजेशाही जाऊन लोकशाही आली होती. ५) मतदान नक्की करा, कारण १९१७ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल गुजरातमधील अहमदाबाद मनपा निवडणुकीत फक्त एका मताने पराभूत झाले होते.
६) मतदान नक्की करा, कारण १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयींचे सरकार विश्वासदर्शक ठरावावेळी केवळ एका मताने कोसळले होते. त्यामुळे मतदान नक्की करा. आपल्या आणि देशाच्या भविष्याकरता योग्य उमेदवाराला मतदान करा.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.