सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदारकीची हॅट्ट्रिक केली. पण निवडणूक होऊन ३ महिनेच उलटले असतानाच उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत खासदारकीचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात दाखल झाले. सातारा लोकसभेसाठी विधानसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणूक होत आहे.
सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे आणि माजी राज्यपाल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने उदयनराजेंच्या संपत्तीची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसते.
त्यावेळी त्यांच्याकडे १२ कोटी ३१ लाख ८४ हजारांची जंगम, तर एक कोटी १३ लाख नऊ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता होती. एक अब्ज १६ कोटी ३५ लाखांची शेतजमीन होती. तसेच ३७ किलो सोने ज्याची किंमत एक कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये होती. आता पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या संपत्तीत वाढ झाली आहे.
नव्या प्रतिज्ञापत्रात जंगम संपत्तीत वाढ होऊन ती १४ कोटी ४४ लाखांपेक्षाही अधिक झाली आहे. उदयनराजेंकडे ९१ लाख ७० हजारांच्या चार अलिशान गाड्या आहेत. यात ऑडी, मर्सिडिज बेन्ज, इन्डिवर, मारुती जिप्सी या गाड्यांचा समावेश आहे, तर पत्नी दमयंतीराजेंच्या नावे पोलो ही चार लाखांची गाडी आहे.
उदयनराजेंच्या नावावर नेमकी किती जमीन आहे?
उदयनराजेंकडे १८५ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यात जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. उदयनराजेंनी त्यांच्या नावावर एकूण ४३४.३५ एकर जमीन आहे. या जमिनीची एकूण किंमत ११६ कोटी ३५ लाख ७३ हजार २२० रुपये इतकी आहे.
उदयनराजेंकडे असलेली जमीन हि काही देशांच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात छोटा देश असणाऱ्या व्हॅटिकन सिटीपेक्षा चौपटहून अधिक आहे. तर जगातील दुसरा सर्वात छोटा देश असणाऱ्या मोनॅकोचे एकूण श्रेत्रफळ हे उदयनराजेंकडे असणाऱ्या जमीनीपेक्षा केवळ ५९ एकरने अधिक आहे.
उदयनराजेंच्या नावावर शुक्रवार पेठ (सातारा), कडोली (सातारा), सोनगाव तर्फे, पेट्रो (सातारा), नवीलोटीवाडी (सोलापूर) या ठिकाणी शेतजमीनी आहेत. तसेच गोडोली, कोडोली (सातारा) येथे बिगरशेती जमीनी आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.