ओमराजे निंबाळकर यांच्यावर आज कळंब उस्मानाबाद येथे चाकूने अजिंक्य टेकाळे या माथेफिरू व्यक्तीने चाकू हल्ला केला यामधून ते बाल बाल बचावले आहे. परंतु हा हल्ला नेमका कोणी व का केला याच्या बद्दल माहिती मिळाली नाही आहे.
३ जून २००६ रोजी मुंबई जवळच्या कळबोली येथे दिवसाढवळ्या पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्राने असे राजकारणातून खून क्वचितच बघितले होते.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्ध त्यांचे चुलत बंधू आणि एक काळचे त्यांचे विश्वासू पवनराजे निंबाळकर शिवसेनेच्या पाठिब्य़ानं अपक्ष म्हणून उभे राहिले होते. तेरणा कारखान्यातील घोटाळ्यावरुन दोनही भावांमध्ये वितुष्ठ वाढलं होतं.
पद्मसिंह पाटलांनी २००४ची निवडणूक जिंकली. मात्र, २००६ मध्ये ३ जूनला नवी मुंबईतील कळंबोली येथे दोन अज्ञात व्यक्तींनी पवनराजे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. २००९ मध्ये त्यांना अटकही करण्यात आली होती. सध्या ते जामीनावर आहेत. मात्र, या प्रकरणाची सीबीआयच्या विशेष न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे.
ज्या तेरणा कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणामुळं हे सर्व झालं तो कारखाना आता बंद पडला आहे. ओमराजे यांनी विधानसभेत राणा जगजितसिंह आणि 2019च्या लोकसभेत पद्मसिंह पाटील यांचा पराभव करुन पराभवाचा वचपाही काढला आहे.
सीबीआयने या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली होती आणि हि सुपारी तीस लाखात देण्यात आली हे सांगण्यात आले होते. या प्रकरणात अन्न हजारे यांची देखील साक्ष देखील घेण्यात आली होती.
पवनराजे हत्याकांडाचा खुलासा करणारा पारसमल जैन पवनराजे यांच्या हत्येबरोबरच समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांची सुपारी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सतीश मंदाडे याच्यामार्फत दिली होती. मात्र आपण ती नाकारली, असं कोर्टातील 164 च्या जबाबात कबूल केलं होतं.
कोर्टातील या खळबळजनक खुलाशानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर 2009 रोजी हत्याचा कट आणि सुपारी दिल्याचा गुन्हा नोंद केला. गेली 10 वर्ष झाले तरी अद्याप या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.
पवनराजे दुहेरी हत्याकांडात पद्मसिंह पाटील यांच्यासह मुंबई येथील नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे हे संशयित आरोपी असून डॉ. पाटील हे 25 सप्टेंबर 2009 पासून जामिनावर आहेत.