महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसह साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उदयराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले आहे.
श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. दोन वेळा ते खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते सिक्कीमचे राज्यपालही होते. कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपाचे अतुल भोसले असा सामना होणार आहे. तर साताऱ्यातून उदयनराजे भाजपाकडून पोटनिवडणूक लढवत आहेत.
त्यामुळे अतुल भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवारी कराडमध्ये अमित शाहांची सभा पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर टीकास्त्र सोडलं. कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
राज्यातील प्रचारसंभांमध्ये सातत्याने कलम ३७० चा मुद्दा काढत अमित शाह भाषण करीत आहेत. त्यावर टीका करताना चव्हाण म्हणाले, राज्यातील निवडणूक प्रचारांमध्ये ३७० कलमावर बोलण्यापेक्षा शहांनी जरा काश्मीरचाच अभ्यास करावा. कारण, पंडित नेहरु होते म्हणून आज काश्मीर भारताचा भाग आहे, असा दाखला त्यांनी शहांवर टीका करताना दिला.
हि केली भविष्यवाणी
मी लोकसभेचा उमेदवार असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीही ते दोन लाख मतांनी जिंकणार आहेत. उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा चव्हाणांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून मी लोकसभा लढलो नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.