केबीसीमध्ये काही असे लोक येतात जे आपल्या संघर्षाने सगळ्यांना प्रेरित करून जातात. ठाणे महाराष्ट्रातील अशीच एक स्पर्धक नुकतीच केबीसीमध्ये येऊन गेल्या. नमिता राउत त्यांचे नाव आहे आणि त्या इंजिनीयर आहे.
सोनी टीव्हीने आपल्या instagram खात्यावर हा व्हिडीओ टाकलेला आहे ज्यामध्ये नमिता राउत आपल्या जीवनात आलेल्या अडचणी आणि त्यांनी त्याचा केलेला सामना ह्या बद्दल सांगत आहेत.
नमिता यांनी १९७५-७६ च्या काळातील या आठवणींना उजाळा दिला होता. या काळात मुलीकरिता उच्च शिक्षण घेणे म्हणजे नवल होते. आणि त्या काळात रूढी परंपरा मागे टाकून त्यांनी हा आपला शिक्षणाचा लढा सुरु ठेवला आणि त्यामध्ये त्यांनी यश देखील संपादन केले.
त्या सांगतात कि सायकलने शाळेत गेल्यावर अनेकदा त्यांच्या शाळेतील मुलांनी त्याच्या शाळेतील मुलांनी अनेकदा त्यांच्या सायकलची हवा सोडून देत होते. जेव्हा त्यांनी बीटेक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी त्यांना या निर्णयासाठी विरोध केला.
अनेकांचे मत होते कि ती एका मुलाची सीट कमी करत आहे. इंजिनीयरिंग काउंसलिंग करिता गेल्यावर देखील त्यांना नकार देण्यात आला होता. त्यांना सांगण्यात आले कि तुम्ही या कॉलेज मध्ये येऊ नका कारण इथे महिलासाठी स्वतंत्र बाथरूम देखील नाही.
त्यांनी केबीसीमध्ये सांगितले कि ह्या गोष्टी ऐकून त्यांनी पक्का निर्धार केला कि आता मला इंजिनियरिंग पूर्ण करायचे आहे. त्यांनी जिथे नकार दिला त्याच कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला आणि शिक्षण पूर्ण केले. काही दिवसा अगोदर बीएचयु मध्ये त्या गेल्या होत्या आणि तिथे महिला साठी स्वतंत्र बाथरूम बघून त्यांना आनंद झाला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.