भारतीय क्रिकेटविश्वात प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून प्रसिद्ध असलेला, टीम इंडियाचा माजी कप्तान दादा उर्फ सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष बनणार यावर आता शिक्कामोर्तब झाले असून नाट्यपूर्ण घडामोडींनंतर सौरवची निवड करण्यात आल्याचे समजते. रविवारी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बीसीसीआयची औपचारिक बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलमध्ये नऊ सदस्य असतात. टीम इंडियाचा माजी फलंदाज अंशुमन गायकवाड यांनी ४७१ मते मिळवून कीर्ती आझाद यांचा पराभव केल्यामुळे त्यांची क्रिकेट असोसिएशनचे पुरुष प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे तर महीला क्रिकेटच्या माजी कप्तान शांता रंगास्वामी यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाली. माजी क्रिकेटपटू सुरिंदर खन्ना कौन्सिलमध्ये आयपीएल जीसी प्रतिनिधी असतील.
भाजपला मिळाली हि मोठी पदे
अध्यक्ष जरी गांगुली असले तरी बाकीच्या महत्त्वाच्या दोन पदांवर भाजप नेत्यांच्या नातेवाईकांची नियुक्ती होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयचे सचिव बनणार आहेत, तर भाजपचे दुसरे नेते आणि वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमल कोषाध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जय शाह हे गुजरात क्रिकेट संघाचे माजी संयुक्त सचिव होते, तर अरुण धुमल हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत. सी.के.खन्ना हे सध्या बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. गांगुली असे दुसरे कर्णधार आहेत, जे बीसीसीआयचे पूर्णकालिक अध्यक्ष होते.
सध्या बंगाल क्रिकेट संघाचे अध्यक्ष असलेले सौरव गांगुली जुलै 2020 पर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्ष पदी राहतील. हे यामुळे की 6 वर्षांच्या त्यांचा प्रशासकीय कार्यकाळ जुलै 2020 मध्ये पूर्ण होत आहे. ते 2014 मध्ये बंगाल क्रिकेट संघाच्या संयुक्त सचिव बनले होते. आता 47 वर्षीय गांगुली जुलै 2020 मध्ये कॅब पदाधिकारी म्हणून 6 वर्ष पूर्ण करतील. त्यानंतर कूलिंग ऑफ पिरियड सुरु होईल.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.