तस राजकारणात शिक्षण महत्वाचे नाही परंतु आधुनिक काळात काही अल्पशिक्षित उमेदवार असणे आश्चर्याची गोष्ट आहे. मुंबईच्या आजूबाजूच्या भागात सुशिक्षित मतदार आहेत परंतु उमेदवार अल्पशिक्षित आणि यात काही प्रसिद्ध चेहरे देखील आहेत जे बघून आपल्याला आश्चर्य वाटेल कि मंत्री संत्री आमदार यांचे शिक्षण एवढे कमी आहे.
शिवेसेनेचे आमदार एकनाथ शिंदे शिवसेना ठाणे संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख, आमदार, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ, ठाणे तसेच महाराष्ट सरकारचे परिवहन मंत्री यांचे शिक्षण फक्त ११ वी झालेले आहे. शिवसेनेचे प्रताप सरनाईक ओवळा माजीवाडा या मतदारसंघाचे आमदार यांचे शिक्षण फक्त १०वा वर्ग एवढे आहे.
मनसेचे ठाणे येथील प्रसिद्ध उमेदवार अविनाश जाधव यांचे शिक्षण १० वा वर्ग एवढे आहे. रमेश सुकन्या म्हात्रे कल्याण ग्रामीण हे १० वी नापास आहे. भाजपचे गणेश नाईक एरोली यांचे शिक्षण ११वा वर्ग एवढे आहे.
मंदा म्हात्रे भाजपा बेलापूर उमेदवार यांचे शिक्षण फक्त ७ वा वर्ग एवढे झाले आहे. शांताराम मोरे भिवंडी ग्रामीण शिवसेना उमेदवार यांचे शिक्षण ४ था वर्ग एवढे झाले आहे. नरेंद्र मेहता मीरा भाईदर भाजपा उमेदवार यांचे शिक्षण फक्त ८ वा वर्ग एवढे आहे.
ज्योती कलानी उल्हासनगर राष्ट्रवादीचे उमेदवार यांचे शिक्षण १२ वा वर्ग एवढे आहे. तर यांच्या विरोधात असलेले भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांचे शिक्षण फक्त १० वा वर्ग एवढे आहे. कल्याण पूर्वचे भाजपा उमेदवार गणपत गायकवाड यांचे शिक्षण फक्त ७ वा वर्ग आहे.
मुरबाडचे भाजपा उमेदवार किसन कथोरे यांचे शिक्षण ११ वा वर्ग नापास एवढे आहे. महेश चौगुले भिवंडी पश्चिम यांचे शिक्षण फक्त ११ वर्ग एवढे झाले आहे. आता मतदार उच्च शिक्षित आणि उमेदवार अल्पशिक्षित या निवडणुकीत या भागात ४० % उमेदवार हे अल्पशिक्षित आहे आणि यात प्रमुख पक्षाचा समावेश आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.