आनंद चिंतामणी दिघे ! अलीकडच्या काळातील तरुणांना कदाचित आनंद दिघे यांच्याबद्दल जास्त माहिती नसेल. १९७० च्या दशकात ठाणे जिल्ह्यात उदयाला आलेले हे नेतृत्व आपल्या कार्यशैलीचा जोरावर इतके लोकप्रिय बनले होते कि अल्पावधीतच “ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे” म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
दिघेंनी कधीही निवडणूक लढली नाही, मात्र ठाणे जिल्ह्यातील टेंभी नाक्याजवळ “आनंद आश्रम” उभा करुन दररोज जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबार भरवून त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर आपला वाचक निर्माण केला होता. ते राबवत असलेल्या धार्मिक कार्यामुळे त्यांना जनतेने “धर्मवीर” अशी उपाधी दिली.
ऑगस्ट २००१ मध्ये अपघातामध्ये दिघेंचे निधन झाल्याची बातमी समजताच चिडलेल्या शिवसैनिकांनी हॉस्पिटलच जाळून खाक केले होते. अशा या शिवसेनेच्या ढाण्या वाघाच्या आयुष्यातील हा किस्सा आपल्याला आम्ही सांगणार आहोत…
आठवणीतील १९९९ ची निवडणूक
१९९५ च्या निवडणुकीत युतीची सत्ता येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला होता. १९९९ च्या निवडणुकीतही युतीने कंबर कसली होती. ठाणे जिल्ह्यात युती विरुद्ध आघाडी जोरदार लढत होती. पण आनंद दिघेंच्या नेतृत्वाखाली ठाण्यात तेरापैकी आठ शिवसेनेचे आमदार विधानसभेत गेले. याच निवडणुकीत एक किस्सा घडला. निवडणुकीतील रोजच्या दौऱ्यामुळे बाळासाहेब ठाकरे थोडेसे थकले होते.
पण आनंद दिघेंनी त्यांच्याकडे हट्ट करुन त्यांना पालघरला प्रचारासाठी बोलावले. २५ मार्च १९९९ ला सायंकाळी बाळासाहेब पालघरला आले. सभेपूर्वी त्यांना फ्रेश होण्यासाठी म्हणून आनंद दिघे त्यांना पालघरपासून पाच किलोमीटर अंतरावरच्या एका नेत्याच्या बंगल्यात घेऊन गेले. पण अचानक बंगल्यातील लाईट गेली.
…आणि आनंद दिघेंनी बाळासाहेबांना एक दिवस अडकवून ठेवले
बाळासाहेबांनी दिघेंना सभेची तयारी झाली का याबाबत विचारणा केली. दिघेंनी त्यांना सभा आज नसून उद्या असल्याचे सांगितले. बाळासाहेब भडकले. तडकाफडकीने मुंबईला जाण्यासाठी निघाले. वातावरण तप्त झाले. कोणाचीच बाळासाहेबांसमोर जाण्याची हिंमत हात नव्हती. आनंद दिघे धाडस करुन समोर गेलं. “हवं तर मला उद्या सेनेतून काढून टाका, पण तुम्ही सभा केल्याशिवाय जाऊ नका” अशी विनंती त्यांनी केली.
आनंद दिघेंचे साद घालणारे शब्द पाहून बाळासाहेबांचा राग शांत झाला. बाळासाहेब थांबले. एका तासाच्या सभेसाठी बाळासाहेबांनी एक दिवस तिथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सभा झाली. अडचणीत असणाऱ्या जागी शिवसेनेचा उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.