पैलवान राहुल आवारे महराष्ट्राच्या मातीत घडलेला हिरा ज्याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवून भारताचे नाव जागतिक स्तरावर नेले आणि कुस्तीत भारताचा दबदबा कायम ठेवला. दुष्काळी पट्ट्यात माळेवाडी हे राहुल आवारेचे मूळ गाव आहे. येथेच त्याची वडिलोपार्जित शेती असून, आजही राहुलचे नातेवाईक येथेच राहत आहेत.
राहुलचे चौथीपर्यंतचे शिक्षण माळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर आवारे कुटुंबीय पाटोदा (जि. बीड) येथे स्थायिक झाले. बाळासाहेब हेही नामांकित कुस्तीपटू. त्यांची राहुल व गोकूळ ही दोन्ही मुले कुस्तीपटू आहेत.
राहुल आवारेच्या यशामुळे जामखेडसारख्या दुष्काळी तालुक्याचे नाव आज खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राहुल आवारेने मिळविलेले यश सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
आनंदाची गोष्ट हि आहे कि राहुल आवारे यांचा साखरपुडा झालेला आहे आणि मुलगी प्रसिद्ध कुस्तीपटू भारताचे माजी आंतरराष्ट्रीय पैलवान काका पवार यांची कन्या आहे.
काका पवार हे राहुल आवारेचे वस्ताद देखील आहे. अर्जुनवीर काकासाहेब पवार हे राहुल आवारे याचे गुरु असून स्व. हरिश्चंद्र बिराजदार यांच्यानंतर राहुलवर पुत्रवत प्रेम त्यांनी केले.
जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा तो महाराष्ट्राचा पहिला पैलवान ठरला आहे. राहुल आवारे आणि ऐश्वर्या पवार यांचा साखरपुडा पुण्यात संपन्न झाला. २०१८ सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं सुवर्ण पदक मिळविले होते.
२०११ आणि २०१९ च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदकनंतर 2011 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये त्यानं सुवर्णपदक पटकावलं होतं. राहुल आवारे याच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र तसेच देशातील कुस्तीप्रेमींना राहुलच्या लग्नाची बातमी नक्कीच आनंद देणारी आहे.
राहुल आवारे व ऐश्वर्या पवार यांच्या साखरपुडा लवकरच पार पडला आहे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खासरे कडून शुभेच्छा ! आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.