सुप्रिया सुळे या विरोधकांनी केलेल्या चांगल्या कामाची देखील स्तुती करायला मागे पुढे बघत नाहीत. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पंच्च्याहत्तर वर्षे वयाच्या बापाला आपल्या राजकारणाच्या यशासाठी दुसऱ्याच्या दारात हात जोडावयास लावत असेल तर तो वंशाचा दिवा काय कामाचा? त्यापेक्षा आम्ही लेकी बऱ्या, आम्ही आमच्या बापावर ती वेळ येऊ देणार नाही, असा टोला पक्षबदल करणाऱ्या नेत्यांना लगावला होता.
मागील काही दिवसात झालेले पक्षप्रवेश हे पुत्र प्रेमापोटी झाले होते असा त्यांनी आरोप केला. त्यांनी यावेळी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता हा टोला लगावला होता. आज मात्र त्यांनी एका पक्षबदल केलेल्या नेत्याचं कौतुक केलं आहे.
नवी मुंबई मधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक आणि त्यांच्या पुत्रांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र त्यांना उमेदवारी नाही मिळाली. गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांना ऐरोलीमधून उमेदवारी मिळाली.
आपल्या वडिलांना तिकीट न मिळाल्याने संदीप नाईक यांनी माघार घेत गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघ सोडला. बेलापूरमधून तिकीट नाकारल्यानंतर गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. भाजपाकडून नाईक यांना एबी फॉर्मही देण्यात आला. संदीप नाईक यांची उमेदवारी रद्द करुन त्यांचे वडिल गणेश नाईकांना भाजपाने उमेदवारी दिल्यामुळे त्यांचं कौतुक होत होतं.
आज यामध्ये सुप्रिया सुळेंची भर पडली. वडिलांसाठी आपल्या आमदारकीचा त्याग करणाऱ्या संदीप नाईकांचं कौतुकही त्यांनी केलंय. संदीप यांचं कौतुक करताना, सुजय विखे आणि विजयसिंह मोहिते पाटलांना नाव न घेता त्यांनी टोलाही लगावला.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, ‘गणेश नाईक आमच्या पक्षात होते, तेव्हा घरात बसून 30-30 तिकटाचं वाटप ते आमदारांना करायचे. आज, त्यांच्या घरातील दोन तिकीटांसाठी किती अडचण त्यांची झाली. मी त्यांच्या मुलाचंही कौतुक करते, कारण मुलाने वडिलांसाठी त्याग केलाय. खरच कौतुकास्पद गोष्ट आहे, आजकाल महाराष्ट्रात दिसत नाही.’
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.