राफेल करारावरुन सत्ताधारी आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. नेमका किती रुपयांचा करार झाला? हे निर्मला सीतारामन का सांगत नाहीत असा प्रश्न राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला होता. त्यामुळे राफेल कराराचा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेर चांगलाच गाजला होता.
दसऱ्याच्या मुहूर्तावर आज जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेलं राफेल लढाऊ विमान भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झालं. राजनाथ सिंह भारताचे संरक्षण मंत्री दसर्याच्या मुहर्तावर यांनी शस्त्र पूजन केले. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला.
फ्रान्समधील दसॉ अॅव्हिएशन या कंपनीने पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाला सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे. डेप्युटी एअर फोर्स चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी तासभर या विमानातून उड्डाण केली. भारताने ५९ हजार करोड रुपये खर्च करून ३६ राफेल लढाऊ जेट विमान विकत घेतलेले आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये भारत व फ्रांसचा हा करार झाला होता.
सध्या भारताला १ विमान मिळालेले आहे पुढील मे पर्यंत अजून ४ विमाने मिळतील. सगळे ३६ राफेल जेट विमान सप्टेंबर २०२२ पर्यंत भारताला मिळणार असे सांगितल्या जात आहे. तो पर्यंत भारत आपल्या वैमानिकांना राफेलचे प्रशिक्षण देणार आहे.
राफेल मध्ये काय आहे विशेष ?
राफेल ६० हजार फुट उंच उडू शकतो. या विमानाची इंधन क्षमता हि १७ हजार किलोग्राम एवढी आहे. राफेल मल्टिरोल फाइटर एयरक्राफ्ट आहे, याचा आकार सुखोई पेक्षा छोटा असल्याने उडविण्यासाठी सोपा आहे.
या मध्ये स्काल्प मिसाइल आहे. हे मिसाईल हवेतून जमिनीवर ६०० किमी पर्यंत निशाना लावू शकते. राफेलची मारक क्षमता ३७०० किमी पर्यंत आहे आणि स्काल्पची रेंज ३०० किमी पर्यंत आहे. हे विमान २४,५०० किलो पर्यंत वजन नेण्यास सक्षम आहे. ६० तासाची अतिरिक्त उडान घेण्यास हे विमान सक्षम आहे.
हे विमान २२२३ किमी प्रती तास एवढ्या वेगाने उडू शकते. राफेलच्या हस्तांतरण सोहळ्याआधी संरक्षण मंत्री राजनाथ यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास महत्त्वपूर्ण चर्चा झाली.