कलकत्ता पूर्ण देशात देवी नवरात्री साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. दुर्गापूजेची परंपरा सुमारे ४०० वर्ष जुनी आहे असे मानले जाते. बंगालमधील तारिकपूर भागात ही प्रथा सुरू झाली. बंगालमधून ही प्रथा बनारसला व आसामलाही पोहोचली. तिथून इ.स.१९११मधे दिल्लीत ही पूजा सुरू झाली. स्वातंत्र्यलढ्यात या पूजांची केंद्रे ही राजकीय आणि सामाजिक चर्चांची महत्त्वाची ठिकाणे बनली होती.
सार्वजनिक पातळीवर दुर्गापुजेची सुरुवात बंगालमधील कोलकत्ता शहरामध्ये इ.स. १७५७ साली सावोबाजारच्या राजा नबदेव याने केली. प्लासीच्या लढाईत लाॅर्ड क्लाईव्ह याने सिराज-उद-दौला याच्यावर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हे साजरीकरण केले गेले होते. या पूजेसाठी राजाने लाॅर्ड क्लाईव्हला आमंत्रित केले.
बंगाल प्रांतात या उत्सवासाठी कारागीर विशेष प्रकारच्या देवीच्या उत्सवमूर्ती तयार करतात. यामध्ये महिषासुरमर्दिनीसह लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या देवतांच्या मूर्तीही तयार केल्या जातात. परंतु या नवरात्र उत्सवात सर्वात जास्त चर्चेत राहिली सोन्याने बनविलेली मूर्ती.
तब्बल २० करोड रुपये खर्च करून देवीची सजावट करण्यात आली आहे. संतोष मित्र स्केवर येथे हि १३ फुट देवीची मूर्ती बसविण्यात आली आहे. सोने आणि हिरे जडित या मूर्तीची देखरेख करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे.
समितीचे सचिव सजल घोष यांनी सांगितले कि देविची मूर्ती डोक्यापासून तर पायापर्यंत सोन्याने मढवीण्यात आलेली आहे. त्यांनी दावा केला आहे कि देशातील हि सर्वात महाग मूर्ती आहे. तब्बल ५० किलो सोने वापरून हि मूर्ती बनविण्यात आली आहे.
देवीचे वाहन सिंह आणि महिषासुर यांना पण सोन्याने सजविण्यात आलेले आहे. हि मूर्ती बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत आहे. देवीच्या पंडाल मध्ये देखील सोने लावण्यात आलेले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.