धनगर समाजाचे नेते म्हणून राज्यभरात गोपीचंद पडळकर प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीत भल्याभल्यांना घाम फोडणारे गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत आमदारकीसाठी अखेर भाजपची वाट धरली आहे. भाजपवर मनसोक्त तोंडसुख घेणाऱ्या पडळकर यांना भाजपने झाले गेले विसरून पावन करून घेतले आहे. खासदारकी मिळाली नाही, पण आमदारकी मिळते का, याचीच उत्सुकता त्यांच्या समर्थकांना आहे.
मागे वंचित बहुजन आघाडीशी गद्दारी केल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकर यांना जोडयांनी मारणाऱ्याला 50 हजाराचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते. जालना येथे जय भीम सेनेकडून हे बक्षीस जाहीर केले होते.
गोपीचंद पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातू आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण असलेलं शपथपत्रही जोडले आहे. या शपथपत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा लेखोजोखा मांडण्यात आला आहे. त्यानुसार पडळकर यांच्याकडे जवळपास कोटी रुपयांची संपत्ती आहे.
विवरण पत्रात पडळकर यांनी ते शेतकरी असल्याचे लिहिले आहे. गेल्या काही वर्षांत 60 लाखांची स्थावर मालमत्ता आणि 24 लाख रुपयांची चारचाकी गाडी खरेदी केली आहे. पडळकर यांनी 95 हजार रुपयांची रोख रक्कम दाखवली आहे. विविध बँकांत 17 हजार रुपयांची ठेव आहे. त्यांनी 2013 मध्ये चोवीस लाख रुपयाची चारचाकी गाडी खरेदी केली आहे.
त्यांच्याकडे साठ हजार रुपयांचे 20 गॅ्रम सोन्याचे दागिने आहेत. पिंपरी बुद्रूक (ता. आटपाडी) येथे दहा लाखांची साडेतीन एकर जमीन, झरे येथे पंचवीस लाखांची 6 एकर शेतजमीन आहे. बिगर शेतजमीन विटा येथे 28 लाख रुपयांची आहे. पडळकरवाडी येथे 3 लाख आणि झरे येथे 7 लाख रुपयांचे घर आहे. पडळकर यांचे शिक्षण बारावी आहे. ते सध्या शेती करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत आयकर विवरण पत्र भरलेले नाही.
स्वत:ला नेहमीच माझं सगळं उघडंय, माझ्याजवळ पैसाच नाही, असे म्हणणारे पडळकर जवळपास करोडपती आहेत, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पे लाईक करायला विसरू नका.