रावण असे पात्र आहे ज्याला विसरणे अशक्य आहे. आणि असेच काही छोट्या पडद्यावर रावण होऊन गेले आहेत ज्यांचे नाव अजरामर त्यांच्या भुमिकेमुळे झालेले आहेत. गब्बर, मोगेम्बो इत्यादी पेक्षा या पात्रास लोकांनी त्या काळात डोक्यावर घेतले होते. रामायणास अनेक वेळा मोठ्या पडद्यावर आणले आहे परंतु टीव्हीवरील रामायणास तोड नाही आहे.
१. अरविद त्रिवेदी:-
रामानंद सागर यांनी बनविलेल्या संपूर्ण रामायण मधील सर्व पात्र अतिशय प्रसिद्ध झाले होते. त्यापैकी एक होते अरविंद त्रिवेदी आजही रावण हा विचार डोक्यात आला कि आपणास अरविंद त्रिवेदी यांचा चेहरा आठवतो. अनेक जण आले आणि गेले परंतु या रावणाच्या अभिनयास तोड नाही.
२. प्रेम नाथ:-
आजच्या काळात नाही तर पहिले पासून धार्मिक विषयावर सिनेमे बनत आले आहे. १९७६ मध्ये आलेला सिनेमा “बजरंग बली” या सिनेमात रावणाचे पात्र प्रेम नाथ यांनी साकारले होते. या नंतर प्रेम नाथ हे “शोर” आणि “अमीर गरीब” अशा सिनेमात दिसले होते.
३.कार्तिक जयराम
टीव्हीचे जग बदलत गेले आणि त्यानंतर आला काल व्हीएफएक्स आणि एक्शनचा या काळात परत रामायण आले. या काळात एकता कपूर यांनी “सिया के राम” हि मालिका आणली. रामायण नवीन तर रावण देखील नवीन येणारच ना हि भूमिका कार्तिक जयराम यांनी साकारली आहे.कार्तिक कन्नड अभिनेता आहे त्यांनी अनेक कन्नड सिनेमात काम केलेले आहे.
४. आर्य बब्बर
नुकतीच टीव्हीवर आलेली मालिका ‘संकट मोचक महाबली हनुमान’ या मालिकेमध्ये रावणाची भूमिका राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर यांनी केलेली आहे. आर्य ने या शिवाय हिंदी आणि पंजाबी सिनेमात काम केलेले आहे.
आपल्याला वरील माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.