आजकाल युवकांना प्रोफेशनल डिग्री आणि नामांकित कॉलेजची पदवी हे त्यांचे ध्येय आहे, त्यानंतर चांगली नौकरी मिळायला हवी आणि ७ अंकी पैकेज बस हेच सर्वाचे आयुष्यातील अंतिम ध्येय बनले आहे. परंतु आम्ही नेहमी शोधतो असे लोक ज्यांनी समाजात चालत आलेल्या ह्या पद्धतीस तिलांजली देऊन स्वतःचा मार्ग निवडून यशाचे शिखर गाठले.
बरेच लोक असे असतात ज्यांना १० ते ६ चालणारी ऑफिसची नौकरी आवडत नाही. राधिका अरोरा सुध्दा याच लोकात समाविष्ट आहे तिने एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक चांगल्या पगाराची नौकरी सोडून स्वतःचे काम सुरु केले आहे आणि आता आपल्या या निर्णयावर ती अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे. चला तर आज खासरेवर बघूया राधिकाचा हा भन्नाट प्रवास..
चंडीगढ़ ग्रुप ऑफ कॉलेज मधून एमबीए झाल्यानतर राधिकाला चंदिगढ येथेच नौकरी करिता रहावे लागले. ती रिलायन्स जिओमध्ये चांगल्या पगारावर नौकरी करत होती. परंतु दुसर्या गावात राहणे म्हणजे प्रत्येक गोष्टी मनासारखी घडत नाही. तिला तिथले जेवण पसंद नव्हते त्यामुळे अधिक वेळ ती बाहेरच जेवण करत असे. ती सांगते नौकरी करताना तिला एकाच गोष्टीची आठवण नेहमी येत असे.
ती म्हणजे आईच्या हातानी बनविलेला स्वयंपाक नेहमी तिला आठवत असे. यामुळे तिला एक भन्नाट आयडिया आली ती आयडीया होती खाण्याचा हातगाडा सुरु करायची. एमबीए ची पदवी असल्याने धंद्यातील यश अपयश तिला चांगलेच कळत होते तुरंत नौकरी सोडून तिने मोहाली येथील फेज८ या औद्योगिक भागात स्वतःचा हातगाडा लावला आणि तिच्या दुकानाचे नाव होते “मा का प्यार”
राधिकाच्या गाड्यावरील अन्न एवढे रुचकर होते कि लवकरच तिच्या दुकानातील सर्व पदार्थ संपत होते. रोज ती ७० प्लेट पदार्थ बनवत होती, परंतु दिवसान दिवस तिच्या या हातगाड्याची लोकप्रियता वाढत गेली लोकांना घरच्या सारखे जेवायला मिळत होते आणि तिला यातच समाधान मिळत असे. तिच्या या व्यवसायाचे गुपित एकच आहे कि ती घरच्यासारखे पदार्थ बनवते. तिच्या हातगाड्यावर राजमा-चावल, कढी चणे भेंडी इत्यादी पदार्थ असतात. याकरिता तिने एक आचारी नेमलेला आहे जो सर्व पदार्थ बनवतो.
राधिकाच्या या व्यवसायाची सुरवात एवढी सोपी नव्हती. तिच्या समोर अनेक संकटे होती. स्थानिक प्रशासनाकडून परमिशन घेऊन रस्त्यावर हातगाडा लावणारी ती पहिली आहे ज्या करिता तिला बराच वेळ लागला. राधिकाने १ लाख रुपये गुंतवून या व्यवसायाची सुरवात केली. तिच्या घरचेहि तिच्या या निर्णयामुळे द्विधा मनस्थितीत होते. त्यांना वाटायचं आपल्या मुलीने एवढे शिक्षण घेतले आणि आता काय तर रस्त्यावर हात गाडा लावणार.
परंतु राधिकाने ह्या सर्व गोष्टीवर लक्ष न देता स्वतःचा मार्ग निवडला आणि त्यामध्ये ती यशस्वी झाली. घरच्यांना वाटायचं मुलगी शिकलेली आहे आणि आता रस्त्यावर उभी राहून हातगाड्यावर काम करणार का ? परंतु जेव्हा तिच्या या हातगाड्याची कमाई येणे सुरु झाली तेव्हा घरच्यांना पटले कि राधिकाचा निर्णय योग्य होता. आज अभिमानाने तिच्या घरचे तिच्या या साहसी निर्णयाबद्दल सर्वाना सांगतात.
आज राधीकाचे दोन हातगाडे आहेत. पहिला औद्योगिक एरिया मोहाली आणि दुसरा विआयपी रोड जीरक पूर येथे. तिच्या गाड्यावर पदार्थ एवढे रुचकर असतात कि जो येतो तो स्तुती करून जाणारच. तिच्या टीम मध्ये एकूण ५ लोक काम करतात. या कामाकरिता राधिकाला तिच्या मित्राने खूप मदत केली. तिच्या या खासरे निर्णयाकरिता खासरे तर्फे तिला सलाम….
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.. आपल्याकडील खासरे गोष्टी तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता..