निवडणुक म्हणलं की पक्ष आले, पक्ष म्हणलं प्रचार आला आणि प्रचार म्हणलं की निवडणूक चिन्हे आली. केवळ निवडणूक चिन्हांनीच आपल्याकडे काही निवडणुका गाजवल्या आहेत हा इतिहास आपल्याला परिचित आहे. कित्येकदा नावापेक्षा नुसत्या चिन्हामुळेच कित्येक उमेदवार निवडून गेले आहेत. मतदारसंघातील उमेदवार बदलत राहतात, पण निवडणूक चिन्ह तेच असल्यामुळे चिन्हावर लढायला मिळावे म्हणून उमेदवारांची स्पर्धा असते. या चिन्हांबाबत जास्त माहिती उपलब्ध नाही. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत…
राष्ट्रीय पक्षांची निवडणूक चिन्हे
भारताच्या स्वतंत्रलढ्याच्या काळात १८८५ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसचे चिन्ह बैलजोडी हे होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात गाय-वासरु ते आजचा हाताचा पंजा हा काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास आहे. १९५१ मध्ये स्थापन झालेल्या जनसंघ म्हणजेच आजच्या भारतीय जनता पार्टीचे निवडणूक चिन्ह दिवा होते, कालांतराने नांगरधारी शेतकरी ते कमळ असा त्यांच्या चिन्हाचा प्रवास आहे.
बहुजन समाज पक्षाचे निवडणूक चिन्ह हत्ती हे समाजाच्या विशाल संख्येचे प्रतीक आहे. शेतकरी आणि कामगारांच्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह कोयता हातोडा तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह बाली कोयता आहे. १९९९ ला स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गतिमान विकासाच्या संकल्पनेवर आधारित त्यांचे चिन्ह घड्याळ आहे. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे चिन्ह राष्ट्रीय ध्वजामध्ये दोन फुले असे आहे.
प्रादेशिक पक्षांची निवडणूक चिन्हे
समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह लाल आणि हिरव्या रंगाच्या ध्वजावर सायकल असे आहे. द्रमुकचे चिन्ह उगवता सूर्य तर अण्णा द्रमुकचे चिन्ह दोन पाने असे आहे. १९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेने धनुष्यबाण हे चिन्ह स्वीकारले आहे.
लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाने कंदील, तर सेक्युलर जनता दलाने डोक्यावर धान्य घेतलेल्या महिलेचे चित्र चिन्ह म्हणून स्वीकारले आहे. आम आदमी पक्षाने झाडू तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे इंजिन निवडणूक चिन्ह घेतले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.