२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये सामील असणाऱ्या पक्षांची बोळवण संपायचे काही नाव घेत नाही. आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीतुन काढता पाय घेतला. त्यानंतर शिवसंग्रामने महायुतीत आपल्याला सन्मान मिळत नसल्याची टीका केली होती. आता महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची अशीच बोळवण सुरु आहे. भाजपने आम्हाला धोका दिला असा थेट आरोप करत महादेव जानकरांनी आपल्या एकमेव आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पाहूया नेमकं काय घडलं ?
रासपला जागा सोडलेल्या असताना भाजपचा बी फॉर्म का जोडला ?
निवडणुकीत उमेदवाराला बी फॉर्म बंधनकारक असतो. त्यापैकी ए फॉर्म सर्व उमेदवारांना सामुदायिकपणे दिला जातो, तर बी फॉर्म प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्रपणे दिला जातो. मित्रपक्षाने राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सोडलेल्या असताना भाजपचा स्वतःचा बी फॉर्म देऊन आम्हाला धोका दिला आहे असा आरोप जानकरांनी केला आहे.
रासपच्या बी फॉर्मवर गंगाखेडला शिवसेनेकडून सुटलेल्या जागेवर उभा असणारा उमेदवार हाच आता आमचा एकमेव अधिकृत उमेदवार आहे असे त्यांनी सांगितले आहे.
भाजपचा बी फॉर्म जोडणाऱ्या या एकमेव आमदाराची केली जानकरांनी पक्षातून हकालपट्टी
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील रासपच्या तिकिटावर दौंडचे राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा प्रभाव करून रासपचा पहिला आमदार म्हणून विधानसभेत पाऊल ठेवले. परंतु २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या भाजपकडून उमेदवार होत्या.
आताच्या विधानसभा निवडणुकीत राहुल कुलांनी भाजपच्या बी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांचा रासपशी संबंध नाही, मी त्यांची पक्षातून हकालपट्टी करत आहे असे जाणकारांनी सांगितले आहे. सोबतच जिंतूरच्या मेघना बोर्डीकर यांनीही भाजपचा बी फॉर्म त्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.