तानाजी सावंत यांनी भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चर्चा सुरु झाली ती त्यांच्या संपत्तीची. साखर सम्राट तानजी सावंत हे शिवसेनेला सर्वाधिक पक्षनिधी देणारे नेते म्हणून ओळखले जातात. तानाजी सावंत एकदा वादग्रस्त व्यक्तव्यात अडकले होते, तेव्हा ते म्हणाले होते की मी महाराष्ट्राला भिकारी बनवेल.
असं वक्तव्य करुन वादाच्या केंद्रस्थानी आलेले, शिवसेनेचे यवतमाळचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांनी बिनशर्त माफी मागितली होती. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकावचे रहिवाशी आहे. त्यांचं शिक्षण पुण्यात झालं. पुण्यात जेएसपीएम नावांनी चार शैक्षणीक संकुल, चार खाजगी साखर कारखान्याचे मालक, उस्मानाबाद जिल्ह्यात सोनारी इथे खाजगी कारखाना. त्यांनी उस्मानाबादच्या वाशी सह. कारखाना चालवायला घेतला आहे.
सोलापर जिल्ह्यात लुंगी आणि विहाळ इथेही कारखाना काही वर्ष अगोदर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे भाऊ शिवाजी सावंत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य होते. पक्षात येताच शिवसेनेनं यवतमाळ इथून विधानपरिषदेची उमेदवारी दिली व आता विधानसभा उमेदवारी देखील दिली आहे.
तानाजी सावंत यांच्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे समोर आले. त्यांची एकूण संपत्ती 180 कोटी 72 लाख एवढी आहे. शपथ पत्रातील 1 ते 9 अनुक्रमांत देण्यात आलेल्या माहितीनुसार सावंत यांच्याकडे जंगम मालमत्ता 127 कोटी 15 लाख, 83 हजार, 2019 रुपये आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 31,73,900 रुपये एवढी जंगम मालमत्ता आहे.
तर रोख रक्कम फक्त 50 हजार रुपये. ही रक्कम बँकेच्या ठेवी, शेअर्स, मालमत्ता भाडे, साखर कारखाने, गाड्या आणि दागिने यांच्या रुपात आहे. त्यांच्या स्थावर मालमत्ता शपथपत्रातील एक ते पाच अनुक्रमांकात सावंत यांच्याकडे 53,56,66,100 रुपयांची आहे. पत्नीच्या नावे 5, 68 लाख रुपयांची मालमत्ता आहे.
सावंत यांच्यावर असलेले कर्ज विविध बँका आणि वित्तीय संस्था यांचे मिळून 11,66,45,693 रुपये आहे. तानाजी सावंत सध्या शिवसेनेचे विधानपरिषदेचेचे आमदार आहेत. तसेच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आहेत.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.