भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी भारतातील सर्व संस्थानिकांशी बोलून ही संस्थाने भारतात विलीन करुन घेतली. हैद्राबाद हे त्यावेळचे उत्तर आणि दक्षिण भारताच्या मधोमध पसरलेले सर्वात मोठे संस्थान होते. त्यावेळच्या हैद्राबादच्या निजामाने हैद्राबाद संस्थानाच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला नकार दिला.
हैद्राबादचा निजाम मीर उस्मान अली याने जनआंदोलन चिरडण्यासाठी रझाकार संघटनेच्या मदतीने अमानुष अत्याचार सुरु केले. शेवटी भारत “ऑपरेशन पोलो” राबवून १९४८ मध्ये निजामाला हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यास भाग पाडले. हा झाला इतिहास !
पण नुकताच मागच्या ७० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात निजामाच्या संपत्तीवरून सुरु असणाऱ्या खटल्याचा निकाल लागला असून पाकिस्तानने निजामाच्या वंशजाला ३ अब्ज रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाहूया काय आहे प्रकरण ?
काय आहे निजामाच्या संपत्तीचा आणि पाकिस्तानचा संबंध ?
वास्तवात ही घटना आहे १९४८ सालातली ! भारत सरकारने हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्याच्या दृष्टीने ऑपरेशन पोलो मोहीम राबवली. त्यावेळी हैद्राबादचे निजाम मीर उस्मान अली यांचे अर्थमंत्री नवाब मोईन नवाज जंग यांनी निजामाचे पैसे सुरक्षित राहावेत या हेतूने निजामाची परवानगी न घेताच १० लक्ष पौंड (जवळपास ८९ कोटी रु.) ब्रिटनमधील तत्कालीन पाकिस्तान हाय कमिशनर हबीब इब्राहिम रहिमतुल्लाह यांच्या बँक खात्यावर जमा केले होते. सध्या ती रक्कम लंडनच्या नॅशनल वेस्टमिंस्टर बँकेत आहे.
७० वर्षांच्या खटल्यात भारत विजयी, पाकिस्तानला द्यावे लागणार ३०० कोटी रुपये
हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. आपल्या अर्थमंत्र्यांनी परवानगी न घेताच आपले पैसे रेहमतुल्लाह यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती मिळताच निजामाने रेहमतुल्लाहला पैसे परत करण्यास सांगितले. पण त्यांनी या पैशांवर पाकिस्तनाचा हक्क असल्याचे सांगत नकार दिला. निजामांनी ब्रिटनच्या हायकोर्टात दाद मागितली. ७० वर्षांपासून हा खटला सुरु होता.
आजच्या काळात त्या पैशांचे मूल्य जवळपास ३ अब्ज रुपये होते. भारत सरकारने या लढ्यात निजामाला मदत केली. २ ऑक्टोबरला मार्कस स्मिथ या लंडनच्या रॉयल कोर्ट ऑफ जस्टीसच्या न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल दिला. त्यांनी या पैशांवर निजामाचे वंशज मोकर्रम जाह आणि भारताचा अधिकार असल्याचे सांगितले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.