संपूर्ण जगात चर्चा विषय ठरलेल्या भारताच्या “चांद्रयान २” मोहिमेचे प्रमुख के.शिवन यांच्याविषयी आता काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. लहानथोरांपासून सर्वांनाच त्यांच्याविषयी माहिती आहे. चांद्रयान २ मोहिमेच्या संपूर्ण टीमने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे शेवटच्या २ किमी अंतरात विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने ही मोहीम अपूर्ण राहिली.
परंतु इस्रोच्या संपूर्ण टीमने देशवासीयांचे मन जिंकले. मोहिमेच्या अपयशाने शिवन यांच्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंनी संपूर्ण देशाला भावुक केले. अशा या के.शिवन यांना नुकताच एक आनंददायक असा अनुभव आला.
फ्लाईटमध्ये झाले उत्साहात स्वागत
इस्रोचे अध्यक्ष के. शिवन हे नुकतेच एका इंडिगो विमानाच्या इकॉनॉमी क्लास मधुन प्रवास करत असताना पाहण्यात आले. ज्यावेळी के.शिवन फ्लाइटमध्ये चढले तेव्हा फ्लाईट मधील लोकांनी त्यांना ओळखले आणि सर्वजण त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे सरसावले.
के.शिवन यांनीही सर्वांना मनमोकळेपणाने सेल्फी देऊन त्यांच्याशी आस्थेने संभाषण केले. तसेच त्यांचे कौतुक करणाऱ्या सर्वांना हात करून त्यांच्या भावनांचा स्वीकार केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.
बघा व्हिडीओ :
सर्वांचे कौतुक आणि आभार स्वीकारून के.शिवन जेव्हा आपल्या आसांकडे जाण्यासाठी वळले तेव्हा फ्लाईटमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव केला.
खरंच, ज्या पद्धतीने आपल्या देशातील सामान्य लोकांद्वारे एका वैज्ञानिकाला असा मानसन्मान दिला जात आहे, ते पाहता आपल्या के.शिवन यांचा उत्साह नक्कीच दुणावला असेल. त्यांना अशाच प्रोत्साहनाची गरज आहे. जेव्हा देश पाठीशी उभा राहतो तेव्हा वैज्ञानिकांनाही त्यांची मोहीम फत्ते करण्यासाठी बळ मिळते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.