समाजात विकृती वाढत चालली आहे याचा प्रत्यय एका फेसबुक वापरकर्त्याला आला आहे. आम्ही या माणसाचे नाव नाही सांगणार कारण हि माहिती गोपनीय आहे. प्रश्न विचारणारा सदर व्यक्तीचे खाते फेसबुकवर आहे. प्रोफाईल फोटो वर सेल्फी घेतलेला फोटो लावण्यात आला आहे.
फोटोमध्ये मागे मुलीचे कपडे दिसत आहे यावरून असा अंदाज बांधता येतो कि हा माणूस लेडीज कपड्याचे दुकान चालवितो. फेसबुक प्रोफाईलवर कवर फोटो देखील आहे ज्यामध्ये दोन लहान मुले आणि त्यांच्या बाजूला एक महिला बसलेली दिसत आहे. ज्यावर लोकांनी “नाईस फैमिली” असे लिहलेले आहे.
यासर्व गोष्टीवर हा अंदाज लावता येतो कि हा माणूस लग्न झालेला आहे आणि सदर फोटो हा त्याच्या कुटुंबाचा आहे आणि त्याला दोन मुल देखील आहे. आता बघूया या महाशयांनी नेमके काय केले ? त्यांनी एका फेसबुक पेज वर मेसेज केला आणि विचारले, मुलींना सेक्सी बनवायचे औषध कोणते ?
सेक्सीचा अर्थ समजून घेऊया या शब्दाचा अर्थ होतो, कामुक, आकर्षक, कामोत्तेजक, उत्तेजित करणारा. या शब्दाचा अर्थ सरळ सरळ एखाद्या पुरुष आणि स्त्रीच्या शरीराशी संबंधित आहे. तर हा व्यक्ती बिमारीचे औषध नाही तर स्वतःच्या शरीराची भूक भागविण्यासाठी हे विचारत आहे.
आता यांनी प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर देणे आवश्यक आहे. त्यांना फेसबुक पेज वाल्यांनी सकाळ संध्याकाळ पाण्या सोबत दोन गोळ्या घेण्याचा सल्ला दिला पहिल्या गोळीचे नाव आहे कंसेंट म्हणजे स्त्रीची सहमती आहे. आणि दुसऱ्या गोळीचे नाव आहे म्यूचुअल रिस्पेक्ट म्हणजे एकमेकाचा सन्मान हे आहे. जर ह्या गोष्टीची अमलबजावणी केली तर आपली समस्या दूर होईल असा रिप्लाय त्यांना देण्यात आला.
पुढच्या व्यक्तीचा सन्मान आणि सहमती कुठल्याही नात्यात आवश्यक आहे हे या महाभागास कळले असेल किंवा नाही हे माहित नाही परंतु आपल्या आजूबाजूच्या जगात असले लोक आहे हे आपणास नक्की समजले असेल.
वरील माहिती आपणास आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.