निवडणुकीत अर्ज दाखल हे करणे हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे यामध्ये चूक झाल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होतो आणि तो उमेदवार निवडणूक लढवू शकत नाही. असेच काही या पुढील मतदार संघात घडले आहे.
चिंचवडमध्ये 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. यात महायुतीचे लक्ष्मण जगताप यांच्यासह बंडखोरी केलेले शिवसेनेचे राहुल कलाटे व महाआघाडीचे प्रशांत शितोळे यांचा समावेश होता. दोघांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले होते.
विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड मतदारसंघात शुक्रवारी (दि. 4) या अंतिम मुदतीत 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची आज (शनिवारी) छाननी झाली. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी दाखल केलेला अर्ज बाद झाला. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला नसल्यामुळे शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे.
त्यामुळे राहुल कलाटे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत शंकर पाडुरंग जगताप, विजय निवृत्ती वाघमारे, राजकुमार घनश्याम परदेशी, प्रकाश भाऊराव घोडके अशा पाच उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. नामनिर्देशन पत्र लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील नियम 33 नुसार हे अर्ज बाद करण्यात आल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता राहुल कलाटे आता हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी होती. अपक्ष उमेदवारास पाठींबा देऊन हि निवडणूक जिंकायची अशी खेळी असू शकते अशी लोकामध्ये कुरबुर आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.