भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघामध्ये दमदार लढत चालू आहे. भारताच्या पहिल्या डावातील ५०२ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने चांगली फलंदाजी करत ४३१ धावा केल्या. भारताला ७१ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात चांगला खेळ करत आफ्रिकेवर चांगली आघाडी मिळवली आहे.
आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर मयांक अवघ्या ७ धावा करून माघारी परतला आणि भारताला २१ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर रोहितनं खिंड लढवत भारताला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन गेला आहे. दुसऱ्या डावातहि रोहितनं चार खणखणीत षटकार खेचून शतक झळकावत इतिहास रचला आहे.
रोहितने या सामन्यात १३ षटकार ठोकले असून एका कसोटीत सर्वाधिक १३* षटकार खेचणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं नवज्योत सिंग सिद्धूचा १९९४ सालचा ८ षटकारांचा विक्रम आज मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितनं वन डेत २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६, तर ट्वेंटी-20त २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० षटकार खेचले आहेत.
रोहितने या सामन्यात पहिल्यांदाच सलामीला फलंदाजी केली. त्याने सलामीला आल्यानंतर आपल्या पहिल्याच दोन्ही डावांमध्ये शतक झळकावत इतिहा रचला आहे. सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात शतक झळकावणारा रोहित हा जगातील पहिलाच फलंदाज बनला आहे.
एकाच सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावण्याची कामगिरी भारताकडून यापूर्वी विजय हजारे यांनी एकदा, सुनील गावसकर यांनी ३ वेळा, राहुल द्रविड २ वेळा, विराट कोहली एक वेळेस, अजिंक्य रहाणे एक वेळेस आणि आता रोहित यांना हि कामगिरी करता आली आहे.
रोहितने या सामन्यात अजून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित हा भारतात लागतात ७ सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्याने राहुल द्रविडचा(६) विक्रम मोडला.
रोहित शर्मा दुसऱ्या डावात १२७ धावांची जबरदस्त खेळी खेळून आऊट झाला. यात त्याने ७ खणखणीत षटकार ठोकले. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.