लोकसभा निवडणुकीपासून दूर राहिलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे चित्र हळू हळू स्पष्ट होत आहे. मनसेमध्ये मागील काही दिवसात चांगली इनकमिंग निवडणुकीच्या निमित्ताने होत असल्याचे दिसून येते. मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ३ याद्या जाहीर केल्या आहेत. राज ठाकरे चांगली मोर्चेबांधणी या निवडणुकीसाठी करत आहेत.
मनसेमध्ये इनकमिंग सुरु असताना राज ठाकरेंना एक मोठा धक्का बसला होता. त्यांचा एक महाराष्ट्र सैनिक जो आपल्या धडाकेबाज आंदोलनांनी संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला होता तो शिवसेनेत गेला. मनसेचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आणि आपल्या मनसे स्टाईल खळ्ळ खट्याक आंदोलनांसाठी नेहमी चर्चेत राहणारे नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली.
नितीन नांदगावकर यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांचा सेना प्रवेश मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या पक्षाला सोडचिट्ठी देण्याचे कारण पहिल्या २ याद्यांमध्ये उमेदवारी मिळाली नाही हे असल्याचे बोलले जात होते. पण ते उमेदवारी न मिळाल्याने नाही तर दुसऱ्याच कारणामुळे मनसे सोडून सेनेत गेले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
नितीन नांदगावकर खरंच अचानक सेनेत गेले?
नितीन नांदगावकर हे मनसेच्या वाहतूक सेनेचे राज्य सरचिटणिस होते. आपल्या धडाकेबाज आंदोलनांमुळे त्यांनी राज्यभरात आपली एक वेगळी ओळख बनवली होती. त्यांनी मुंबईत आजपर्यंत अनेक मराठी माणसांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांची मनसेला सोडचिठ्ठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पण नितीन नांदगावकर यांचा हा प्रवेश एका रात्रीत झाले नसल्याचे समोर आले आहे. समाज माध्यमांवर नितीन नांदगांवकर यांना मनसेने तिकीट का नाकारलं याचीच चर्चा रंगली. पण धक्कादायक म्हणजे नितीन नांदगावकर हे ६ महिन्यांपासून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्त्रनामा या वेबसाईटने याविषयी वृत्त दिले आहे.
त्यांना काही डमी काँट्रॅक्टर कंपनीच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याशी संबंधित कॉन्टॅक्ट मिळाले असल्याचं वृत्त आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना जागा आणि भाडे परवडत नसे मग आता अचानक त्यांना हे परवडायला कसं लागलं आणि महागड्या कार त्यांच्याकडे कशा आल्या असा आरोप त्यांच्यावर होत आहे.
विशेष म्हणजे ठाण्यातील विभागाध्यक्षाने त्यांना स्वखर्चाने ऑफिस देण्याचा प्रस्ताव दिला होता. जो त्यांनी फेटाळला होता. यावरून त्यांनी अगोदरच सेनेचं जायची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.
त्यांना निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती केली होती. पण त्यांनी मनसेकडून लढवण्यास नकार दिला होता. त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच पक्ष प्रवेश ठरवला होता. पण ऐन विधानसभेच्या तोंडावर प्रवेश करून त्यांनी सहानुभूति मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.