महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जवळपास घोषित झाल्या आहेत. उमेदवार वेगवगेळ्या प्रकारे शक्तिप्रदर्शन करुन आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार सर्व माध्यमांचा वापर करुन घेत आहेत.
अलीकडच्या काळात सोशल मीडियावरुन प्रचारावर जोर दिला जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या फेसुबक पेजेस, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, शेअरचॅट, इत्यादि सोशल माध्यमांचा वापर केला जात आहे. परंतु या सोशल प्रचारात कुठलाही अनुचित किंवा वादग्रस्त प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगही या सोशल मीडियावरही आपली करडी नजर ठेवणार आहे.
निवडणूक आयोग आणि सायबर सेल एकत्रित काम करणार
निवडणूक काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने गृह विभागाच्या सायबर सेलची मदत घेतली आहे. सोशल मीडिया तसेच ऑनलाईन प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयात चार वॉररुम बनवण्यात आल्या आहेत.
याद्वारे सोशल मीडिया तसेच ऑनलाईन माध्यमांत जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, तसेच मॉबलिंचिंग आणि दंगलीला चिथावणी देणाऱ्या गोष्टींचा शोध घेऊन संबंधितांवर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक नुकसान झाल्यास ते ही वसूल केले जाणार आहे.
अशा प्रकारे ठेवली जाणार नजर
निवडणुकीतील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयात राज्य माहिती व जनसंपर्क विभागाकडून चार वॉररुम तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या वॉररुममध्ये २० LED TV लावण्यात आले असून त्या माध्यमातून सर्व न्यूज चॅनेल्सवरील बातम्यांकडे लक्ष ठेवले जाणार आहे. दुसऱ्या वॉररुममध्ये सर्व छापील माध्यमांतिला बातम्यांमधला प्रत्येक शब्द तपासून जाहिराती आणि पेडन्यूजची पडताळणी करणार आहे.
तिसऱ्या वॉररुममध्ये सायबर नियंत्रण व ट्रोलिंग कक्षाच्या मदतीने फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि शेअरचॅट, इत्यादि माध्यमांवरुन प्रसारित होणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यावरच्या फोटो, पोस्ट्स आणि व्हिडिओंमुळे आचारसंहिता भंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर आधी तो कन्टेन्ट तिथून काढून टाकला जाणार आहे आणि नंतर संबंधित अकाउंटधारकाला त्याबद्दल खुलासा मागण्यात येणार आहे.
समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्या अकाउंटधारक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अनेकजण सोशल मीडियावरील पोस्टस न वाचताच फॉरवर्ड करत असतात. अशा पोस्ट्समुळे सामाजिक तेढ निर्माण झाल्यास आपल्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigil नावाच्या अप्लिकेशनवर सोया केली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.