निवडणूक आली की उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राकडे विरोधकांपासून पत्रकारांपर्यंत सर्वांचेच लक्ष असते. आचारसंहितेचा भाग म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून त्यांच्या संपत्तीचे विवरण घेतले जाते.
उमेदवारांची ही सर्व प्रतिज्ञापत्रे मुख्य निवडणूक अधिकारी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करत असतात, त्यामुळे सर्वांना ती पाहण्यासाठी उपलब्ध होतात. या प्रदिज्ञापत्रांवरूनच आम्ही वेगवेगळ्या उमेदवारांविषयी बातम्यांचे चित्रण करत आहोत. पाहूया अशाच एका उमेदवाराविषयी बातमी…
३४ कोटींची संपत्ती असणाऱ्या या उमेदवाराने सायकलवर जाऊन भरला उमेदवारी अर्ज
कोल्हापूरचे ऋतुराज पाटील यांना काँग्रेसकडून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात उमेदवारीचे तिकीट मिळाले असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. ऋतुराज पाटील हे माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील यांचे नातू आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आहेत.
प्रतिज्ञापत्रानुसार ऋतुराज यांची संपत्ती ३४ कोटी ३५ लाख रुपयांची असून इतकी संपत्ती असणाऱ्या उमेदवाराने चक्क सायकलवरुन रॅली काढून आपला उमेदवारी भरल्याने त्याविषयी चांगलीच चर्चा होत आहे.
काय सांगते ऋतुराज पाटलांचे प्रतिज्ञापत्र ?
ऋतुराज पाटलांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे वय २९ वर्ष असून त्यांच्याकडे २ कोटी ६२ लाखांची पोर्शे कार असून २७ लाखांची फोर्ड कार देखील आहे. ४ लाखांची एक बाईक आहे.
त्यांच्यावर अद्याप कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाही. घर, शेती, बंगला, दागिने मिळून ११ कोटी ४७ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय व्यवसाय, रोख ठेवी, शेअर्स अशी २२ कोटी ८८ लाखांची संपत्ती ऋतुराज पाटलांच्या नावावर आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.