काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवर फेरफार होणार होती. त्याबाबत बोलणं सुरू असून एक-दोन दिवसात तो प्रश्नही निकाली निघेल, असं जयंत पाटील यांनी सांगितले होते. हे बोलणे आता आटोपले असून यादी जाहीर झालेली आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि आघाडीतील वादावादी यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उमेदवारांचे नाव घोषित होणे बाकी होते.
खालील प्रमाणे आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी
राष्ट्रवादी काँग्रेसची ७७ जणांची उमेदवारी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. परळीमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मुंडे अशी तर इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात दत्तात्रय भरणे अशी काट्याची टक्कर होणार हे निश्चित झाले आहे.
परळीतून धनंजय मुंडे, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, इस्लामपूरमधून जयंत पाटील या नेत्यांची नावेही यादीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या पक्षाच्या 77 उमेदवारांची पहिली यादी आज मंगळवारी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यातील चार मतदारसंघाचा समावेश आहे. त्यात पर्वतीतून नगरसेविका आश्विनी कदम, हडपसरमध्ये नितीन तुपे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची इतर मित्रपक्षाची आघाडी आहे. आघाडीतील जागावाटपानुसार 125-125 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी तर 38 जागांवर मित्रपक्ष लढणार आहेत. त्यानुसार राष्ट्वादीने आज एकूण 77 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.