‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटातुन स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटातून ताश्कंदमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधित कुठलीतरी बातमी हाती लागल्यामुळे तर शास्त्रींचा मृत्यू झाला नव्हता ना असा प्रश्न उपस्थित केला आहे. देशातील या दोन महान नेत्यांच्या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे.
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू किंवा त्यांच्या शेवटच्या काळासंदर्भातील कागदपत्रे केंद्रीय माहिती आयोगाच्या शिफारशीनंतरही अद्याप ‘गोपनीय’ आहेत. तेव्हापासून या गोपनीयतेबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या दंतकथा जन्माला घालण्यात आल्या आहेत. लाल बहादूर शास्त्री यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यानेच (ज्यांचा नंतर संशयास्पद मृत्यू झाला) या दंतकथांना हवा दिली. परंतु लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूसंदर्भात या सात प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळाली नाहीत.
१) घटनास्थळी सापडले संदिग्ध पुरावे : लाल बहादूर शास्त्री यांच्यासोबत असलेल्या अधिकारी आणि इतर ऑफिशियल स्टाफला त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत गेलेला स्वयंपाकीसुद्धा बदलून स्थानिक स्वयंपाकी देण्यात आला होता. त्यांना निवासस्थान ताश्कंद शहरापासून १५ किमी अंतरावर ठेवले होते. तसेच त्याच्या खोलीत बेल किंवा फोनही ठेवण्यात आला नव्हता. यामागे काय कारण होते ?
२) पोस्टमोर्टम का झाले नाही : शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरावर पांढरे निळे डाग आढळले होते. तसेच त्यांच्या मानेच्या पाठीमागे आणि पोटावर कापल्याचे निशाण होते. असे असूनही त्यांचे पोस्टमोर्टम का करण्यात आले नाही ? त्यांचे पर्सनल डॉक्टर आर.एन.चुग यांचे म्हणणे होते की शास्त्रीजींनी हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता.
३) प्रत्यक्षदर्शी साक्षीदार : ताश्कंदमध्ये शास्त्रींचा मृत्यू झाला त्या रात्री दोन साक्षीदार तिथे उपस्थित होते. एक त्यांचे पर्सनल डॉक्टर आर.एन.चुग आणि तर दुसरे त्यांचे सेवक रामनाथ. १९७७ मध्ये शास्त्रीजींच्या मृत्यूच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या संसदीय समितीसमोर हे दोघेही हजर होऊ शकले नव्हते.दोघांनाही ट्रकने धडक दिली, त्यात डॉक्टर साहेब मारले गेले तर रामनाथची स्मृती गमावली.
४) माहिती अधिकारात कोणतेही उत्तर मिळाले नाही : लाल बहादूर शास्त्रींना विष देऊन मारले गेल्याच्या संशयावरून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर संशोधन करणाऱ्या पत्रकार लेखक अनुज धर यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. यावर प्रधानमंत्री कार्यालयाकडून उत्तर आले की याबाबतीत केवळ एकच कागदपत्र उपलब्ध आहे. शेजारच्या देशांसोबतचे संबंध बिघडण्याच्या भीतीने ते सार्वजनिक करता येणार नाही असे सांगण्यात आले.
५) CIA सोबत जुळणारे धागे : पत्रकार ग्रेगरी डग्लस यांना दिलेल्या मुलाखतीत सीआयएचे एजंट रॉबर्ट क्रोले यांनी दावा केला आहे की, “सीआयएने शास्त्रीजींच्या मृत्यूचा कट रचला होता. एवढेच नव्हे तर त्या दाव्यानुसार डॉ.होमी भाभा यांच्या अपघातातील मृत्यूमागेही सीआयएचा हात होता. अमेरिका त्यांच्या कूटनीतीच्या माध्यमातून डॉ.भाभांना मारू इच्छित होती.”
६) कोणाच्या आदेशानुसार कागदपत्रे गोपनीय झाली : आजपर्यंत शास्त्रीजींच्या मृत्यूशी किंवा त्यांच्या शेवटच्या काळासंदर्भातील कागदपत्रे कुणाच्या आदेशानुसार गोपनीय घोषित करण्यात आली हा प्रश्न आहे. ७) समितीची चौकशी सार्वजनिकरित्या करण्यात आली नाही : १९७७ मध्ये शास्त्रीजींच्या मृत्यूच्या चौकशीसाठी राज नारायण समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची संपूर्ण तपासणीही समोर आणण्यात आली नाही.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com इमेल आयडीवर पाठवू शकता.