शक्तीपीठाची संख्या वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळी दिलेली आहे परंतु हे शक्तीपीठ कसे निर्माण झाले हे अनेकांना माहिती नाही आहे. हस्तलिखितांनुसार महापीठपुराण या ग्रंथात शक्तिपीठाच्या एकूण ५२ स्थळांची नोंद आहे. त्यांपैकी २३ बंगाल प्रांतात आहेत, १४ सध्याच्या पश्चिम बंगाल(भारत) मध्ये तर एक बस्तर(छत्तीसगड)मध्ये तर बांगलादेशमध्ये ७ आहेत.
मुख्य अठरा पुराणांपैकी एक असलेल्या ब्रम्हांड पुराणच्या संबंधाने बघावयाचे तर,प्राचीन भारतात पार्वतीची ६४ शक्तिपीठे सांगितलेली आहेत. त्यांत सद्य भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका यांचा समावेश आहे. या मंदिरांची दुसरे ठिकाणी नोंद, नवव्या शतकातील हिंदू तत्त्वज्ञानी आदिशंकर यांनी लिहिलेल्या शक्तिपीठ स्तोत्रात आहे.शरीराचा भाग किंवा दागिना म्हणजे शरीराचा जो भाग किंवा अंगावरचा जो दागिना पृथ्वीवर पडला, आणि ज्यावर तेथे मंदिर बांधण्यात आले.
अष्टादश शक्तीपिठाचा इतिहास
वायुपुराणानुसार, सती ही आधीच्या जन्मात, दक्ष व प्रसूती यांचेपासून झालेली ‘सती’ हे नाव असलेली कन्या होती. दक्ष प्रजापतीची कन्या सतीचा शंकराशी विवाह झाला, पित्याच्या या विवाहाला विरोध होता. कालांतराने दक्षराजाने शंकरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी यज्ञ सुरू केला.
पित्याच्या घरी होणाऱ्या यज्ञासाठी पार्वती निमंत्रणा शिवाय व शंकरांनी नकार दिला असतांना गेली, तेथे तिचा व शंकराचा अपमान झाला. तो सहन न झाल्याने सतीने योगाग्निमध्ये स्वतः ला जाळुन घेतले. शंकराला हे कळल्या नंतर त्यांनी आपली एक जटा तोडून आपटली, त्यातुन विरभद्र व इतर गण निर्माण झाले.
शंकराच्या आज्ञेने त्यांनी दक्षप्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला. सतीचा अर्धवट जळालेला देह घेऊन शंकर संतप्त होऊन तिनही लोकात भ्रमण करू लागले. तेव्हा सर्व देवता मिळुन विष्णुला शरण गेले. सतीचा देह जो पर्यत जवळ आहे तो पर्यत शंकर शांत होणार नाही म्हणून विष्णुने सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे १८ खंडास विभाजन केले ते तुकडे भारतखंडात जेथे पडले तेथे शक्तीपिठाच्या रूपांने माता स्थिर झाली.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com इमेल आयडी वर पाठवू शकता.