राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नमिता मुंदडा यांचे नाव घोषित केल्यानंतरही त्यांनी अचानक तडकाफडकी दोन ओळींचा राजीनामा देत पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत त्यांनी आणि पती अक्षय मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपकडून त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. परंतु या पार्श्वभूमीवर अक्षय मुंदडा यांचे एक भाषण चांगलेच व्हायरल होत आहे. त्यातून आपल्या आईला दिलेला शेवटचा शब्दही मुलाने पळाला नाही अशी टीका अक्षय मुंदडांवर होत आहे.
कोण होत्या अक्षय मुंदडा यांच्या आई ?
दिवंगत डॉ.विमल मुंदडा या अक्षय मुंदडा यांच्या आई होत्या. त्यांनी पाच वेळा केज-अंबेजोगाई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. पहिल्या दोन टर्म त्या भाजपमधून तर शेवटच्या तीन टर्म त्या राष्ट्रवादी कडून आमदार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारले.
आघाडी सरकार सत्तेत असेपर्यंत त्यांनी सरकारमध्ये जवळपास ९ वर्षे कॅबिनेट, राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. २२ मार्च २०१२ रोजी आमदार असतानाच त्यांचे कर्करोगाने निधन झाले.
आपल्या आईचा शेवटचा हा शब्द मुलाला पाळता आला नाही
काही दिवसांपूर्वी अक्षय मुंदडा यांनी बीडला शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या संकल्प मेळाव्यात आपल्या आईची आठवण करून देताना सांगितले होते “राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार साहेब यांच्यावर मुंदडा कुटुंबाची खूप श्रद्धा आहे.
माझ्या आईने तिच्या मृत्यूपूर्वी शेवटच्या काळात मला सांगितले होते, की एक वेळ राजकारण सोड पण शरद पवार साहेबांना सोडू नको.” परंतु आता राष्ट्रवादीकडून अक्षय मुंदडांच्या पत्नीला उमेदवारी घोषित झाल्यानंतरही त्यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने बायकोच्या शब्दाखातर आईचा शब्द पाळला नाही अशी टीका अक्षय मुंदडा यांच्यावर होत आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com इमेल आयडी वर पाठवू शकता.