पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुण्यात संस्कृतीला जपणारे लोक खूप असून पुण्याची हि वेगळी ओळख जगभरात आहे. हि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट देखील आहे. पण याच पुण्यात काल काही मंडळींनी जे कृत्य केले ते बघून या संस्कृतीला गालबोट लावायचे काम केले आहे.
पुण्यात काल बैलपोळा सण साजरा करण्यात आला. या पारंपरिक सणाला बैलांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते. पुणे जिल्ह्यात हा उत्साह मोठा असतो. इथे डीजे लावून मिरवणूक देखील काढल्या जातात. पण मुळशी तालुक्यातील सुस मध्ये काही लोकांनी बैलासमोर चक्क बारबाला नाचवल्या आहेत.
खरंतर बैलपोळ्याला पारंपारिक मिरवणूक काढली जाते. बैलांची पुजा करून त्यांना आराम दिला जाताे. काल शनिवारी सुस येथे मात्र हे वेगळेच चित्र बघायला मिळाले. बैलपाेळ्याच्या मिरवणूकीत बारबालांना नाचविण्यात आले.
मुळशी पॅटर्न हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्याच मुळशीतील हा वेगळा पॅटर्न काल महाराष्ट्रात चर्चिला गेला. काही मंडळींनी मिळून या पारंपरिक सणाला विकृत स्वरूप देण्याचा कारनामा या माध्यमातून केला आहे.
या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलीच टीका यावर करण्यात आली. गावातील काही उत्साही मंडळींनी व ग्रुपनी बैलांपुढे बारबाला नाचवण्याचा हा प्रताप केल्याची माहिती आहे. तर जुन्या लोकांकडून याला विरोध देखील करण्यात आला.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.